उपमहापौरपदाच्या निवडीवरून शिंदेसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी उघड नाराजी व्यक्त करत, उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते यांच्यावर टीका करत नॉट रिचेबल झाले होते. गटबाजीचे प्रकरण एवढे तापले की, खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हस्तक्षेप करावा लागला. ना. शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना मुंबईला पाचारण करत गटबाजीवरून त्यांची कानउघाडणी करत पक्षशिस्तीचे धडे दिल्याचे बोलले गेले. तसेच गटबाजी करायची असेल तर नाशिकवर फुली मारू, असा सज्जड दमही भरण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानउघाडणीनंतर शहरातील गटबाजी संपुष्टात येईल असे वाटत असतानाच, शुक्रवारी उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वात नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त मनीषा खत्रींची भेट घेतली. मात्र, यावेळी निम्मे नगरसेवक अनुपस्थित असल्याने यावरून पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
गत आठवड्यात नाशिकमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शहराला हिमगौरी आहेर-आडके यांच्या रूपाने महापौर तर विलास शिंदे यांना उपमहापौरपद मिळाले. या निवडीनंतर भाजप आनंदोत्सव साजरा करत असताना, दुसरीकडे मात्र शिंदेसेनेत नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शिवसेनेतील गटबाजी नवीन नाही. अखंड शिवसेना असताना विरोधी पक्षातील विरोधक कमी, मात्र पक्षांतर्गत विरोध व गटबाजी वेळोवेळी उघड झाल्याचे दिसून आले आहे. शिवसेना फुटीनंतर एका पक्षाचे दोन पक्ष झाल्यावर एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. दुसर्या टर्ममध्ये शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. पक्ष सत्तेत असल्याने नाशिकमध्ये शिंदेसेनेने जम बसवला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून येत जिल्ह्यात शिंदेसेना नंबर एकचा पक्ष ठरला. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे भाजपाखालोखाल सर्वाधिक 26 नगरसेवक निवडून आले. दरम्यान, पक्षसंघटनेत काम करताना नगरसेवक, पदाधिकार्यांकडून शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. पक्षशिस्त पाळण्यात भाजपचा नंबर एक लागतो. पक्षातील नियुक्त्या असो, उमेदवारीचा विषय असो, त्यावर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याचा अवलंब होणारच. तेथे व्यक्तिकेंद्रित राजकारण कधीच नसते. यापूर्वी भाजपाच्या काही पदाधिकार्यांच्या डोक्यात आपल्याशिवाय काहीच नाही, ही हवा गेली होती. परंतु, पक्षाने करेक्ट कार्यक्रम करत त्या नेत्याला कडीपत्त्याप्रमाणे बाजूला केले. त्यामुळे पक्षातील गटबाजी असो किंवा आपल्यावर अन्याय झाला म्हणून पदाधिकारी पक्षाला आव्हान देताना विचार केला जातो. भाजपात व्यक्तिकेंद्रित कधीही राहत नाही. व ते अशांचे लाडही करत नाही. याउलट, मात्र इतर पक्षांतले राजकारण बर्यापैकी व्यक्तिकेंद्रित दिसून येते. शिंदेसेनेतील नाराजीकडे लक्ष वेधल्यास महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हे सर्वप्रथम पक्षात आपण आलो, ही त्यांची भावना आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय कसा होऊ शकतो. त्यामुळेच त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. मात्र, तिदमे शिंदेसेनेत आले, त्यांच्यासमवेत उद्धवसेनेचे किती नगरसेवक होते, हे विचारले जात आहे. याउलट ज्यावेळी अजय बोरस्ते उद्धवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी उद्धवसेनेला खिंडार पाडत एकाचवेळी बारा माजी नगरसेवकांसह इतर पदाधिकार्यांचा प्रवेश झाला. त्याचवेळी बोरस्ते यांचे शहरातील राजकीय वजन पक्षाच्या श्रेष्ठींच्या नजरेत आले होते. जेव्हा बोरस्ते यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, त्यावेळी शहरात त्यांचे जोरात वाजतगाजत जंगी स्वागत केले गेले. त्याआधी तशी कोणाची हिम्मत झाली नाही. ती बोरस्ते यांच्या प्रवेशानंतर झाली. उद्धवसेनेतल्या राहिलेल्या माजी नगरसेवकांत भीती होती, ती बोरस्तेंच्या प्रवेशानंतर कमी होऊन नंतर टप्प्याटप्प्याने पक्षात प्रवेश होत गेले. त्यामुळेच त्यांच्यावर ना. शिंदे यांनी जिल्हाप्रमुख व पुढे उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली. बोरस्ते यांना महापालिका प्रशासनातला दांडगा अनुभव असून, तब्बल पाच वेळा पालिकेवर ते निवडून गेले. त्यामुळे गटनेतेपदी त्यांच्यासारखा चेहरा पक्षाच्या फायद्याचाच ठरेल. हे पक्षश्रेष्ठींनाही चांगले ठाऊक आहे. दरम्यान, कोणताही पक्ष असो, ते भांडून किंवा नाराज होऊन मिळत नाही. तिदमेंनी उघडपणे पक्षावर नाराजी व्यक्त करून काय साध्य केले? नाराजी होतीच तर ती पडद्याआड व्यक्त करता आली असती. मनपात उपमहापौरपदी शिंदे व गटनेतेपदी बोरस्ते आल्याने पक्षातील आपले महत्त्व कमी होईल? अशी भीती शिंदेसेनेतील काहींना सतावत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यरात्री वन टू वन नगरसेवकांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन नगरसेवकांना दिले. परंतु, गटबाजी न करता पक्षासाठी काम करा, कामाच्या मूल्यमापनावरच संधी दिली जाईल, असे स्पष्ट करत यापुढे काम करणार्यालाच संधी, असा सूचक इशारा दिला. नाशिकच्या प्रकरणावर सचिव राम रेपाळे यांच्यावर जबाबदारी असून, स्थायी समितीत कोणाला संधी मिळणार, हे तेच ठरवतील. सोमवारी कोणत्या तीन नगरसेवकांना संधी मिळते, हे समजणार आहे. तत्पूर्वी पक्षातील गटबाजी संपली असे चित्र असताना, मनपा आयुक्तांच्या भेटीत मात्र प्रवीण तिदमे, हर्षदा गायकर, सुवर्णा मटालेंसह काही नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने हा
चर्चेचा विषय बनलाय.
When will the factionalism ‘break’?
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…
दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…