महाराष्ट्र

तेरे जैसा यार कहॉं!

फ्रेन्डशिप डे साठी तरुणाई सज्ज
नाशिक : प्रतिनिधी
आज फ्रेन्डशिप डे असल्याने तरुणाई फ्रेन्डशिप डे साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे.
फ्रेन्डशिप डे ला हाताला बांधण्यात येणारे फ्रेन्डशिप बॅन्ड ते गिफ्ट्समुळे गिफ्ट शॉप सज्ज झाले आहे. आज रविवार असल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे. अनेकांनी वेगवेगळे आऊटींगचे प्लॅन आहेत.तर अनेकांचा हॉटेलिंग आणि मुव्हीजचा प्लॅन आहे. काहींनी कालच फ्रेन्डशिप डे साजरा केला आहे. अनेक जण सोमवारी शाळा, महाविद्यालयात फ्रेन्डशिप डे साजरा करणार आहेत. त्यामुळे कोरोनानंतर यंदाचा फ्रेन्डशिप डे दणक्यात साजरा होणार आहे.प्रत्येक व्यक्तीला जन्मजात अनेक नाते मिळत असतात पण काही नाते हे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर निर्माण होत असतात. पण या सगळ्यात नात्यांत एक नाते धुव्र तार्‍यासारखे अढळ आणि निस्वार्थ भावनेने जपलेले असते ते नाते म्हणजे मैत्रीचे. श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यातील मैत्री इतिहास अजरामर आहे. मैत्री ही रंग, रूप, वय, जात,गरीब, श्रीमंत अशा सर्व गोष्टींच्या सीमा तोडत निस्वार्थ आणि निस्सीम भावनेने निभावण्यात येते. त्यामुळे सगळ्या नात्यांच्या तुलनेत मैत्रीच्या नात्यातींल वेगळेपणा कायमच दिसून येते. बालपणापासून ते उतरत्या वयात मैत्रीही कायम सोबत असते. म्हणूनच मैत्रीचे किस्से सांगताना प्रत्येक व्यक्ती भान हरपून जाते. नावापुरती मैत्री न निभावता कृतीतून मैत्री निवारणार्‍या मित्र-मैत्रिणी प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. अशा रक्ताच्या नात्यापलिकडे नाते निभावून मैत्रीचे नाते अधिक घट्ट करणार्‍या मित्र मैत्रिणीं कटू गोड प्रसंगात मैत्री टिकवत असतात.अशाचा जीवलग मित्र मैत्रीणीविषयी मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

8 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

8 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

9 hours ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

9 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

9 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

9 hours ago