भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत,
पाच तासाभराच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश
दिक्षी :_सोमनाथ चौधरी
. सावजाचा पाठलाग करताना नर जातीचा ४ ते ५ वर्षांचा बिबट्या विहिरीत पडल्याची घटना निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे घडली असून पाच तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीत पिंजरा सोडून या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे. सदर बिबट्याच्या बछड्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले असून रात्री त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले जाणार आहे.
. कादवा नदी पट्टा असल्याने वडाळी शिरसगाव कोकणगाव हा परिसर बिबटे यांचे जणू एक समीकरणच तयार झाले आहे. बिबट्याचा हल्ला, पाळीव प्राण्यांना ठार मारणे, दिवसा असो किंवा रात्र नागरिकांना तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होणे हे नित्याचेच बनले आहे. वाढत्या बिबट्याच्या संख्येमुळे शेतकऱ्यांपुढे आपल्या पाळीव प्राण्यांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी निर्माण झाली आहे. त्यातच दिनांक 24 रोजी च्या मध्यरात्रीला सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. शेतकरी संदीप सोनवणे हे आपल्या शेतात काम करत असताना विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज आला तेव्हा त्यांनी विहिरीमध्ये डोकावून बघितले तर बिबट्या विहिरीमधील काठावर बसलेला होता त्यांनी तात्काळ कोकणगाव शिरसगाव परिसरातील सरपंच पोलीस पाटील आणि वन विभागाला याबाबत माहिती दिली तातडीने घटनास्थळी वन विभागाची रेस्क्यू टीम दाखल झाली त्यांनी सदर बिबट्याला पाच तासाच्या अथक प्रयत्नाने पिंजरा विहिरीत सोडून जेरबंद केले सदर बिबट्याला पशुवैद्यकीय डॉक्टरच्या निगराणी खाली ठेवले असून बिबट्या सुरक्षित झाल्याचा खातरजमा करून सदर बिबट्याला वन विभागाच्या सानिध्यात सोडून दिले जाणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.
पाहा व्हिडिओ
संशयित शिताफीने ताब्यात, अटक इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरीतील जोगेश्वरी परिसरात शनिवारी (दि. 28) सायंकाळी तरुणाचा…
इगतपुरीकर त्रस्त; दुचाकीस्वारांना म्हशींची अनेकदा धडक इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी शहर व परिसरात मोकाट जनावरे…
सरपंच जाधवांसह ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा खमताणे ः प्रतिनिधी मुंजवाड ते डांगसौंदाणे रस्त्यावर मुंजवाड गावाजवळील तीव्र…
माजी उपनगराध्यक्ष बाळू उगले यांचे मुख्याधिकार्यांना निवेदन सिन्नर ः प्रतिनिधी शहर व परिसरात वदर्ळीच्या ठिकाणी…
कॉँग्रेस सेवादलाची मनपा आयुक्तांकडे मागणी नाशिक : प्रतिनिधी गोदावरी नदीपात्राजवळ स्मार्ट सिटीने 16 कोटी 39…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबडच्या महालक्ष्मीनगर भागात दोन दिवसांपूर्वी रात्री सुमारे अकरा ते साडेअकरा वाजेच्या…