दुसरे असे की, तुम्ही हे समजून घेणे गरजेचे आहे की, तुम्हाला जो बदल करायचा असतो, त्याच्या उलट काम तुम्ही करत असतात. म्हणजे तसे करण्याची तुम्हाला सवय (Habit) पडलेली असते. आता, सवय म्हणजे काय हे आधी समजून घ्यावे. सवय म्हणजे नकळतपणे, सुप्तपणे, कुठलाही फारसा विचार आणि श्रम ने घेता, असे सहजपणे एखादे काम केले जाते त्याला सवय म्हणतात. ते काम सहजपणे तुम्ही अंगीकृत केलेले असते. उदा. चालणे, गाडी चालवणे, मातृभाषेत बोलणे, जेवण करणे या सवयी प्रत्येकालाच असतात. काहींना भुवया उडवणे, मानेला झटका देणे, केसांत हात घालणे, विशिष्ट हातवारे करणे अशा सवयी असतात. त्या सहजपणे, नकळत ती व्यक्ती करत असते. अशा सवयी तोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते. टोकावं लागतं. तेव्हा कुठे अशा सवयी बदलतात. या वरील सवयी वाईट नाही. परंतु, मद्यपान करणे, सिगारेट/बिडी ओढणे, ड्रग्स ची नशा करणे, या सवयी वाईट असतात. शरीराला आणि जीवाला घातक असतात. त्या निश्चितच बदलल्या पहिजे. न्यू इयरला अशा सवयी बंद करण्याचे रेजोल्युशन अनेक जण करतात. परंतु हा निर्णय फारसा टिकत नाही. कारण या गोष्टींची सवय झालेली असते. आणि जेव्हा सवय अतिप्रमाणात होते, त्याला व्यसन म्हणतात.
रेजोल्युशन तुटण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रेजोल्युशन करण्याचे कारणच स्पष्ट नसते. नाही समजलं का? याचा अर्थ असा की, आपण जे रेजोल्युशन करतो, त्याचा उद्देश निश्चित नसतो. आपण हे रेजोल्यूशन का करतो आहे, याचा उद्देश काय आहे? कशासाठी करायचे आहे? हे केल्याने काय फायदा होणार आहे? स्वतःला काय फायदा होणार आहे, इतरांना कसा उपयोग होणार आहे? हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित असतात. भावनेच्या प्रभावात आपण निर्णय तर घेतो, परंतु तो निर्णय फार काळ टिकत नाही. आपणच तो विसरून जातो, कंटाळा करतो, आणि नंतर सोडून देतो. कुठलीही गोष्ट करतांना त्याचा उद्देश ठरवा, त्याचे कारण शोधा की मला हे का करायचे आहे? उद्देश/कारण नसेल तर ते काम होणारच नाही, हे लक्षात ठेवा. आणि जरी काम झालेच तर त्यातून काही फळ मिळत नाही, उद्दीष्ट सफल होत नाही, निष्कर्ष निघत नाही, त्याचा अनुमान देखील निघत नाही. थोडक्यात काय तर त्यातून रिझल्ट मिळत नाही.
तुम्ही ठरवलेले रेजोल्युशन टिकवायचे असेल तर तुम्ही तुमचा निर्णय इतरांना सांगा. वयक्तिक रेजोल्युशन्स असल्यास जवळच्या लोकांना सांगा, मित्रांना सांगा. सामुदायिक निर्णय शेजारच्यांना सांगा, सोबत काम करणाऱ्यांना सांगा, ग्रुपला सांगा. असे केल्याने तुमचे रेजोल्युशन जिवंत रहाते. ते जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला मदत करतात, तुम्हाला त्याची आठवण करून देतात. कधी कधी हिणवतात, हसतात, खिल्ली उडवतात, टोमणे मारतात. असे करणाऱ्यांना रागावू नका, कारण तुम्ही ठरवलेल्या रेजोल्युशन चीच तुम्हाला आठवण करून देत असतात.
रेजोल्युशन खात्रीशीरपणे साध्य करायचे असल्यास तुमच्या पार्टनर ला सांगा. नवरा/बायको, मित्र/मैत्रीण, आई/वडील यापैकी जो कुणी खूप जवळची, काळजी करणारी, काळजी घेणारी व्यक्ती असेल, त्याला सांगा. तो बरोबर तुमच्याकडून ते काम करून घेईल. यावर्षी मी सांगितल्या प्रमाणे रेजोल्युशन करा. रेजोल्युशन ठरवताना सांगितल्याप्रमाणे गोष्टी करा. त्याचे कारण शोधा, उद्देश ठरवा, त्याचा तुम्हाला आणि इतरांना काय फायदा/उपयोग होणार आहे हे ठरवा. आपण निराशेपोटी, भीतीपोटी, नकारात्मक विचारातून तर निर्णय घेत नाहीए ना, हे बघा. ठरवलेला निर्णय सफल झाल्यास मला नक्की कळवा, मला आनंदच होईल.
View Comments
Nice 👍👍