बलात्कार आणि खुनाची शिक्षा भोगत असलेल्या बाबा रामरहीम या पुन्हा एकदा पेरॉल मिळाला असून, तो परत एकदा 40 दिवस. हरियाणामधील सिरसाजवळ बेगू गावात डेरा सच्चा सौदा आश्रम आहे आणि गुरमित रामरहीम हा या डेरा सच्चा सौदा आश्रमाचा प्रमुख आहे. त्याने आजवर पाच फिल्ममध्ये काम केले आहे. तुरुंगाबाहेर आला आहे. शाह सतनाम महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्याला हा पेरॉल प्रशासनाने मंजूर केला आहे. 2017 मध्ये शिक्षा झाल्यानंतर कधी पेरॉल, कधी फर्लोवर त्याचे जेलच्या आत -बाहेर येणे चालूच असते, यावेळेस तो पंधराव्यांदा जेलबाहेर
आला आहे.
शिक्षा भोगत असलेल्या या बाबा रामरहीमचे आगतस्वागत करण्यासाठी अनेक आलिशान गाड्यांची रांग लागतो. विशेष म्हणजे, यौन शोषणच्या गुन्ह्याखाली तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. वर्षातून तीन-चार वेळा त्याला कधी तीस दिवस, कधी चाळीस दिवसाला पेरॉल मिळतो आणि तो जेलबाहेर येते आणि जणू काही हवापालट म्हणून तो काही दिवस जेलमध्ये जातो. बाबा रामरहीम यालाच अशी विशेष सवलत का मिळत आहे हे जनतेला अनाकलनीय आहे.
शासन, प्रशासन, पोलिस, सर्वपक्षीय राजकारणी, राजकीय पक्ष, नेते, नोकरशहा यांची साथ असल्याशिवाय हे शक्य नाही. एका जेलरने त्याला विशेष वागणूक दिली, नंतर त्या जेलरने नोकरीचा राजीनामा देऊन एका पक्षाकडून निवडणूक लढवली आणि तो आता लोकप्रतिनिधी म्हणून कायदेमंडळात बसला आहे, यातच सगळे काही आले. जवळपास 405 दिवस तो जेलबाहेर आहे. विशेष म्हणजे, तो सिरसा आश्रमात राहणार असून, त्याच्या संरक्षणासाठी पोलिसदेखील तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक काळात तर रामरहीम हमखास जेलबाहेर असतो. रामरहीम हा गंभीर गुन्ह्यातील कैदी असूनसुद्धा पंजाब, हरियाणा उच्च न्यायालय त्याला हार्ड कोर गुन्हेगार मानत नाही आणि जेलमधील त्याच्या वर्तनाचा हवाला देत प्रशासनाकडून त्याला वारंवार पेरॉल किंवा फर्लो मंजूर केला जात आहे. अशा पद्धतीने एखादा कैदी शिक्षा भोगत असेल तर खरोखरच याला शिक्षा म्हणायचे का? रामरहीम याला बाहेर येण्यास सर्वांचा हातभार लागतो हे अधोरेखित होते. एकीकडे हजारो, लाखो कैदी कारागृहात सुनावणी होत नाही म्हणून वर्षानुवर्षे खितपत पडले आहेत. देशासाठी काम करणार्या सोनम वांगचुक यांना तीन-चार महिन्यांपासून जेलमध्ये डांबले गेले आहे. त्याची सुनावणी होत नाही. दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालीद आणि शर्जिल इमाम यांना सर्वोच न्यायालयाने नुकताच जामीन नाकारला. त्यांच्यावरचे आरोप नक्कीच गंभीर आहेत ना, त्याची चौकशी पूर्ण होत आहे ना, आरोपपत्र दाखल केले जात आहे ना, न्यायालयात खटला दाखल होत आहे. केवळ चौकशी चालू आहे, हेच उत्तर दिले जाते. याला खरोखरच न्याय म्हणायचा का? वास्तविक बुवा, महाराज, साधू-संत हे समाजाला शिकवण देतात. अध्यात्माच्या माध्यमातून जनजागृती करतात, समाजाला दिशा देतात, भजन, कीर्तन यामधून समाजजागृती केली जायची. जनतेचे प्रबोधन केले जायचे. भक्ती मार्गाची शिकवण दिली जायची. समाजात सत्प्रवृत्ती रुजवली जायची. त्यामुळे बुवा, महाराज, साधू, संत यांच्याकडे जनता आदराने पाहते, मात्र गेल्या काही वर्षांपासून जनतेच्या भावनांशी खेळत अनेक बुवाबाजांनी श्रद्धेचा बाजार मांडला आहे आणि या बाजारीकरणाचे स्वरूप बदलून पैसा कमावण्याचा धंदा झाला आहे. भव्यदिव्यतेच्या अट्टहासापायी, गर्दी जमवून जणू शक्तिप्रदर्शनच केले जात आहे. ढोंगीबाबांचा तर सुळसुळाटच झाला आहे आणि भोळ्याभाबड्या जनतेला, भक्तांना नादी लावून अनेक बुवा आपले साम्राज्य उभारत आहे आणि अर्थातच बुवांच्या भक्तगणांकडे मतपेटीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याने अनेक राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते हे बुवांचे भक्त होतात. मग त्यांना शासन-प्रशासनाचे सहकार्य लाभते आणि भक्तांची नाही, मात्र अशा बुवा महाराज यांची भरभराट होते. पंचतारांकित आश्रम, साम्राज्य उभे राहते आणि मग एखाद्या सत्संगामध्ये दुर्घटना घडून निष्पापांचे बळी जातात. अनेक बुवा महाराज हे अनैतिक, अवैध धंदे करतात आणि अनेकांवर जेलमध्ये जाण्याचीदेखील वेळ आली आहे. अर्थात, आजही अनेक सत्प्रवृत्तीकडून समाजप्रबोधन केले जात आहे, मात्र काही भोंदूगिरी प्रवृत्तीमुळे सत्संग बदनाम
होत आहे.
बुवाबाजांचे पेव जिकडे-तिकडे फोफावले आहे. मात्र, भक्तांची गर्दी जमवताना एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी घेण्यास हे बुवा-महाराज पुढे येत नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील पुसटशी रेषा ओळखता आली पाहिजे.आज आपण एकविसाव्या शतकात आहोत. जग पुढे गेल्याचे दावे करतो अशावेळी केवळ दर्शन, पदस्पर्श व्हावा यासाठी जिवावर उदार होऊन गर्दी करून काय साध्य होणार, याचा विचार डोळसपणे व्हायला हवा. कायद्यासमोर सर्व समान हे मिथक आहे. काही लोकं कायद्यासमोर अधिक समान असतात.
Why so much ‘mercy’ on the criminal Ram Rahim?
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…