नाशिक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

रामकुंड परिसरात धक्कादायक घटना

पंचवटी : प्रतिनिधी
रामकुंडाकडे जाणार्‍या उत्तमराव ढिकले मार्गावर गुरुवारी (दि. 11) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास पतीने पंचवीसवर्षीय पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही महिला व तिची सासू ही कर्मकांड करताना सहाय्य करण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होती. त्यामुळेे रामकुंड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या महिलेचा गळा आवळून नवर्‍याने खून का केला? कुठल्या कारणाने केला? याचा शोध पोलिस घेत आहेत. शीतल नितीन भामरे (वय अंदाजे 25) असे मृत पत्नीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील रामकुंडाकडे इंद्रकुंड उतारावरील उत्तमराव ढिकले मार्गावर रस्त्यालगत मृत शीतल ही सासू-सासरे,पती यांच्याबरोबर असे राहत होते. पतीला गांजाचे व्यसन होते. सासरा हा भीक मागत असे. शीतल ही पती व तिच्या सासूसह रामकुंडावर कर्मकांड करताना सहाय्य करण्याचे काम करीत असे. बर्‍याच दिवसांपासून मृत शीतल व पती नितीन भामरे यांच्यात वाद सुरू होते. गुरुवारी (दि.11) सुमारे चार वाजेच्या सुमारास घर बंदअसल्याने शेजारी राहणार्‍या नागरिकांनी मयत शीतल हिची गावाकडे गेलेल्या सासू आणि सासरे यांना फोन करून कळविले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सासू व सासरे यांनी येऊन कुलूप तोडले. त्यावेळी शीतल ही मृतावस्थेत आढळून आली. सदर घटना नागरिकांनी पंचवटी पोलिस ठाण्यास कळविली. यावेळी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर घटनास्थळी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनीही घटनास्थळी पाहणी केली.

सकाळपासून वाद; दुपारी खून
पत्नी शीतल व पती नितीन भामरे यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून गुरुवारी सकाळपासूनच वाद सुरू होता. शीतलने याबाबत नणंद पूनम बबन देसले हिला फोनद्वारे वादाची कल्पना दिली होती. ती गावी आलेल्या आई- वडिलांसह नाशिकला आली. तेव्हा घरात शीतलचा मृतदेह आढळून आला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास नितीन याने पत्नीचा गळा दाबून दरवाजा लावून पलायन केले. त्यानंतर एक तासाने ही घटना उघडकीस आली.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago