नाशिक

पतीला वाचवताना पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील शिंदेवाडी येथे पतीला विजेच्या धक्क्यातून वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नीला स्वतःचा जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी प्रसंगामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दीपक खाडे (42) हे गुरुवारी (दि.12) सकाळी सुमारे आठच्या सुमारास पिकांना पाणी देण्यासाठी शेतातील विहिरीवर गेले होते. वीजपंप सुरू करण्यासाठी ते विजेच्या पेटीजवळ गेले असता बटण दाबताच त्यांना अचानक तीव्र विजेचा धक्का बसला. त्यांच्यासोबत पत्नी छाया खाडे (38) उपस्थित होत्या. पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहताच छाया यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना जोराचा धक्का देत बाजूला ढकलले. त्यामुळे दीपक खाडे दूर फेकले गेले व मोठ्या संकटातून बचावले; मात्र पतीचा जीव वाचविताना छाया खाडे स्वतःच विजेच्या धक्क्याच्या विळख्यात सापडल्या.
गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पतीचा जीव वाचविताना स्वतःचे आयुष्य अर्पण करणार्‍या छाया खाडे यांच्या त्यागाने गाव हळहळले आहे.

Wife tragically dies while saving her husband

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago