अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ
चांदवड : वार्ताहर
येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24) झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा बळी गेल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी (दि. 25) शहरात उमटले. भरधाव कारच्या धडकेत स्वाती कृष्णा कुंभार्डे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आणि परिसरातील मद्यविक्रीचे दुकान हटविण्याच्या मागणीसाठी स्थानिक महिलांनी बुधवारी (दि. 25 फेब्रुवारी) सकाळी आशिष वाइन शॉपसमोर रास्ता रोको आंदोलन केले.
मंगळवारी दुपारी गणूर रोडवरून क्रेटा कार (एमएच 18-7171) भरधाव जात होती. त्याचवेळी एका स्कुटीस्वाराने अचानक वाइन शॉपकडे वळण घेतल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार रस्त्याने पायी जाणार्या स्वाती कुंभार्डे यांना धडकली. या भीषण अपघातात स्वाती यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. या अपघातामुळे दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले आहे.
संतप्त महिलांचा एल्गार
या अपघाताला परिसरातील वाइन शॉप आणि रस्त्यावरील अतिक्रमण जबाबदार असल्याचा आरोप करत बुधवारी (दि. 25) सकाळी शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. ‘या दारू दुकानामुळे परिसरात मद्यपींचा कायम वावर असतो. त्यामुळे महिला आणि शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. वारंवार मागणी करूनही हे दुकान हटवले जात नाही,‘ असा आरोप आंदोलकांनी केला. संतप्त महिलांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत दुकान तत्काळ बंद न झाल्यास ते पेटवून देण्याचा इशारा प्रशासनाला दिला.
या आंदोलनाची माहिती मिळताच चांदवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव बागूल, पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी संतप्त महिलांशी संवाद साधून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परिसरात तातडीने गतिरोधक बसवणे आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नगराध्यक्ष वैभव बागूल यांनी रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे मान्य केले.
मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी घटनास्थळी उपस्थित न राहिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत हे मद्यविक्रीचे दुकान आणि रस्त्यावरील अतिक्रमणे कायमची हटवली जात नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार फुलेनगर परिसरातील रहिवाशांनी केला आहे.
Women blocked the way to remove the liquor shop
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…
नाशिकरोडच्या सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, राजकीय, शैक्षणिक, तसेच ट्रान्स्पोर्ट क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, आपल्या मनमिळाऊ…