महिला व्यवसाय कर अधिकारी लाच घेताना जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
लाचखोरी थांबण्याचे नाव घेण्यास तयार नसून व्यवसाय कर अधिकाऱ्यास चार हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. स्नेहल सुनील ठाकूर(52) असे या अधिकाऱ्यांचे नाव आहे.
द्वारका येथील कृषी औद्योगिक संघ लिमिटेड येथे कार्यरत स्नेहल ठाकूर यांनी तक्रारदार यांची कल्पदीप इंडस्ट्रीयल सिक्युरिटी सर्व्हिसेस ही कंपनी दोन वर्षांपासून बंद असल्याने कंपनीचा व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागितली होती. आज लाचेचे 4 हजार रुपये स्वीकारताना पोलीस उप अधीक्षक विश्वजित जाधव, हवालदार प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे, शीतल सूर्यवंशी, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…