महिलांनी साजरे केले हरितालिका व्रत

नाशिक : प्रतिनिधी
उपवर मुलींनी मनासारखा पती, तर विवाहितांंनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरितालिका व्रताचे पूजन सोमवारी (दि. 14) केले. हरितालिका आणि गणेशोत्सव एकाच दिवशी आल्याने महिलावर्गात हरितालिका पूजनासंबधी संभ्रम होता. पण जाणकारांच्या मते हरितालिकेचा उपवास आज (दि. 15 सप्टेंबर) सकाळी सुटणार आहे.
हरितालिकेनिमित्ताने शहर आणि उपनगरांमधील शिवमंदिरे, घर, सोसायटी तसेच मोकळ्या जागेत वाळूची पिंडी पार्वतीसह स्थापन केली होती. यावेळी महिलांनी साजशृंंगार करून मनोकामनेसह पूजन केले.
हरितालिका आणि गणेशोत्सव एकाच दिवशी आल्याने शहर व उपनगरांत पूजनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. याप्रसंगी साजशृंंगार करून मुली, महिलांनी पूजन केले. पूजनानंतर सोशल मीडियावर फोेटो आणि रील्स टाकण्यात आले. यावेळी खास इव्हेंट
फोटोग्राफर्सकडून फोेटोशूट करण्यात आले. पूजनासाठी मैत्रिणी, विविध सोशल मीडिया ग्रुप्स एकत्र येत सोसायटी, अंगण, टेरेस, मंदिरे आदी ठिकाणी पूजन केले. दिवसभर हरितालिकेचा उपवास करण्यात आला.

Women observed the Haritalika Vrat.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *