नाशिक

महागड्या साड्या चोरणाऱ्या महिला सीटीव्हीत कैद

 

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या साडीच्या दुकानात साडी खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी दुकानदाराचे लक्ष विचलित करून अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये किमतीच्या साड्या चोरून नेल्याची घटना घडली.सदर घटना दुकानात असलेल्या सीटीव्हीत कैद झाल्यामुळे आपल्या दुकानात साड्यांची चोरी झाल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले

महिलांना साड्यांची आवड किती असते हे खरं तर सांगण्याची गरज नाही पण याच हौसेपोटी महीला कोणत्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय लासलगाव शहरातील गजबजलेल्या ठिकाणी टिळक रोड येथे असलेल्या दिनेश प्रजापती यांच्या आशापुरा साडी सेंटर येथे आला.दोन महिला साड्या घेण्याच्या बहाण्याने या आशापुरा साडी सेंटर या दुकानात शिरल्या आणि त्यांनी दुकानातील माणसांना साडी दाखवण्यात गुंतवून ठेवलं आणि त्यानंतर या दोन महिलांनी हातचलाखी करून साड्या चोरून त्या आपल्या नेसलेल्या साडीत टाकून तिथून पोबारा केला.

साड्यांची चोरी झाल्याचा प्रकार दुकानदाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लासलगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस तातडीने घटनस्थळी दाखल झाले व सीसीटिव्ही फुटेज च्या आधारे या महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करून या पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago