नाशिक

महिला आरक्षणाची मंगळवारी सोडत

 

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ( दि . ३१ ) सकाळी साडेदहा वाजता महिला राखीव जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे . विशेष म्हणजे ऑन कॅमेरा ही सोडत होणार असून , महापालिका प्रशासनाकडून यासंबंधीची सर्व तयारी सुरू आहे . यासाठी दादासाहेब गायकवाड सभागृह आरक्षित करण्यात आले आहे . अनुसूचित जाती ( महिला ) , अनुसूचित जमाती ( महिला ) आणि सर्वसाधारण ( महिला ) अशा तीन संवर्गासाठी चिठ्ठी पद्धतीने आरक्षण काढले जाणार आहे .

नाशिक महापालिकेतील एकूण जागेच्या पन्नास टक्के महिला राखीव जागांसाठी येत्या ३१ मे रोजी अनुसूचित जाती ( महिला ) , अनुसूचित जमाती ( महिला ) व सर्वसाधारण महिला जागा निश्चितीकरिता प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे . सर्वोच्च न्यायालयाने राज्य आयोगाला ३१ मे रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीत १३३ जागांमधून ६७ जांगावर महिलांसाठी आरक्षण काढण्यात येणार असल्याने आता साऱ्यांच्या नजरा महिला आरक्षणाकडे लागल्या आहेत . महिला आरक्षण निघाल्यास अनेकांचे पत्ते कट होण्याचे तर काहींचे भाग्य उजळणार आहे . त्यामुळे चिठ्ठीच अनेकांचे राजकीय भविष्य ठरविणार आहे . चिठ्ठी पद्धतीने हे आरक्षण काढण्यात येणार असल्याने त्यासाठी शालेय विद्यार्थ्याचा शोधही घेतला जात आहे . त्याची जबाबदारी शिक्षण विभागावर सोपविण्यात आली असून , आरक्षण सोडतीच्या दरम्यान वाद होण्याची शक्यता गृहीत धरून सोडतप्रसंगी पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी पत्र देण्यात आले आहे . निवडणूक घेण्याची सूचना केल्याने न्यायालयाच्या या निर्देशांनंतर १४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने नाशिक महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर केली . निवडणुकीसंदर्भातली सर्व प्रक्रिया पार पाडून पुढच्या तीन – चार महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के महिला आरक्षण याप्रमाणे नाशिक महापालिकेत ६७ जागा महिलांच्या ताब्यात जाणार असून , ४३ प्रभागांत प्रत्येकी एक आणि एका प्रभागात दोन याप्रमाणे ४५ महिलांचे आरक्षण असेल तर उर्वरित २२ जागांच्या आरक्षणाची सोडत पद्धतीने काढण्यात येणार असून , यामध्ये एससी , एसटी आणि सर्वसाधारण जागांचा समावेश असेल . भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आरक्षणाची सोडत होणार असल्याने मनपाने मुंबई नाका पोलीस ठाण्याला बंदोबस्तासाठी पत्र दिले आहे .

हेही वाचा :   सातपूरला अस्वच्छता पाहून मनपा आयुक्तांचा चढला पारा

नाशिक महापालिकेची मुदत मार्च महिन्यातच संपुष्टात आली असली तरी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून ती पुढे ढकलण्यात आली . त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेल्यांना धक्का बसला होता . आता मात्र या आरक्षण सोडतीसाठी यंदा कालिदास कलामंदिरऐवजी दादासाहेब गायकवाड सभागृहाची निवड करण्यात आली आहे .

हेही वाचा : शहरात पाण्याची गरज वाढली दररोज 5 दक्षलक्ष लिटर पाण्याची वाढ

Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

20 hours ago