सातपूर : मनपा आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त रमेश पवार हे आता ऍक्शन मोडमध्ये आले असून, सातपूरला काल अचानक पाहणी दौरा केला. या दौर्यात आयुक्तांना ठिकठिकाणी कचर्याचे ढिग दिसून आल्याने त्यांनी स्वच्छता निरीक्षकांना फैलावर घेतले.
मागील आठवड्यात सातपूर भाजप मंडळातर्फे सातपूर परिसरातील स्वच्छता तसेच विविध समस्यांबाबत निवेदन देत जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर काल आयुक्त पवार यांनी अचानक या भागाला भेट देऊन पाहणी केली. छत्रपती शिवाजी भाजी मार्केट, नासर्डी पूल, प्रबुद्ध नगर, शिवाजीनगर आदी भागातील स्वच्छता नसलेल्या तसेच कचर्यामुळे निर्माण झालेल्या ब्लॅक स्पॉटची पाहणी केली.
मनपा आयुक्तांना ठीक ठिकाणी कचर्याचे ढीग दिसून आल्याने आयुक्तांनी स्वच्छतेच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करत अधिकार्यांना जाब विचारला. अशोक नगर भागात अनेक अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अमृत गार्डन ते बारदान फाटा रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत देखील पाहणी केली यानंतर चुंचाळे परिसरातील घरकुल योजनेची पाहणी केली. यावेळी उपायुक्त करुणा डहाळे, विभागीय अधिकारी नितीन नेर, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, आरोग्य अधिकारी डॉ.आवेश पलोड, नगर रचनाचे अगरवाल, आर एस पाटील अधिकारी उपस्थित होते.
सातपूरला अस्वच्छता पाहून मनपा आयुक्तांचा चढला पारा
One thought on “सातपूरला अस्वच्छता पाहून मनपा आयुक्तांचा चढला पारा”
-
Pingback: महिला आरक्षणाची मंगळवारी सोडत - Gavkari News