नाशिक

लासलगाव-विंचूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात

गांवकरी

इम्पॅक्ट

लासलगाव : वार्ताहर
विंचूर-प्रकाशा महामार्गावरील लासलगाव ते विंचूरदरम्यान रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे आणि उघड्या पडलेल्या लोखंडी जाळ्यांबाबत दै. गांवकरीने 17 जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
लासलगावातील कोटमगाव चौफुली ते दत्ताजी पाटील बँकेदरम्यान काँक्रीट रस्त्याचे लोखंडी गज उघडे पडल्याने आणि मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. पावसाचे पाणी साचल्याने अपघातांचा धोकाही वाढला होता. ही समस्या दै. गांवकरीने मांडल्यानंतर विभागाने तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घेतली. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी कामाच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुरुस्तीचे काम सुरू असताना ओल्या सिमेंटच्या भागाभोवती बॅरिकेड्स, संरक्षणात्मक जाळ्या किंवा कोणतेही इशारा फलक लावण्यात आले नाहीत. परिणामी, अनेक वाहने थेट ओल्या सिमेंटवरून गेल्याने तिथे चिखल झाला असून, वाहनांच्या चाकांचे ठसे उमटले आहेत. यामुळे या कामाच्या टिकाऊपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घेतलेल्या दखलीचे स्वागत करतानाच, भविष्यात अशा कामांच्या वेळी योग्य संरक्षण व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि दर्जा राखण्यावर भर द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Work begins to fill potholes on the Lasalgaon-Vinchur road.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago