3.960 कि.मी. लांबीच्या रस्त्यावर पायाभूत सुविधा
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा, शहरातील वाढती वाहतूक आणि घाट परिसरातील संपर्क व्यवस्था लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेकडून विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पश्चिम विभागात महत्त्वाच्या घाट जोडणार्या मार्गावरील युटिलिटीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. यात केटीएचएम कॉलेज पूल ते जुना गंगापूर नाका, शरणपूर पोलीस चौकी, बॉश (मायको) सर्कल, चांडक सर्कल ते महामार्ग बसस्थानक या सुमारे 3.960 किलोमीटर लांबीच्या मार्गावर विविध पायाभूत सुविधा कामे सुरू आहेत.
सिंहस्थ काळात घाटांकडे जाणार्या भाविकांसाठी तसेच पार्किंग व्यवस्थेशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने कामे नियोजनबद्ध पद्धतीने केली जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. या मार्गावरील पाणीपुरवठा विभागाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तसेच ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी), एमएनजीएल गॅस पाइपलाइन आणि पावसाळी गटार (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) यांची कामेही वेगाने सुरू आहेत. महानगरपालिकेकडून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून उर्वरित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युटिलिटी कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गाचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण अधिक वेगाने करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. वाहतूक वळविण्याची तात्पुरती योजना सदर युटिलिटी कामांच्या अनुषंगाने जुना गंगापूर रस्ता ते याहू हॉटेलदरम्यानच्या रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली असून, वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुरू असलेल्या कामाची वैशिष्ट्य
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घाट जोडणारा महत्त्वाचा मार्ग. एकूण रस्त्याची लांबी 3.960 किमी. पाणीपुरवठा विभागाचे काम 100 टक्के पूर्ण. ओएफसी व महाआयटी सीसीटीव्ही काम 94 टक्क्यांहून अधिक पूर्ण. एमएनजीएल गॅस पाइपलाइनचे काम प्रगतिपथावर. स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे काम प्रगतिपथावर. युटिलिटी कामे पूर्ण होताच रस्ता विकासाला गती. जुना गंगापूर रस्ता ते याहू हॉटेलदरम्यान एका बाजूची वाहतूक तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाची व्यवस्था उपलब्ध.
रस्ताकामाची माहिती
केटीएचएम कॉलेज पूल ते जुना गंगापूर नाका, शरणपूर पोलीस चौकी, बॉश (मिको) सर्कल, चांडक सर्कल ते महामार्ग बसस्थानक. घटक तपशील रस्त्याचा प्रकार डांबरी काँक्रीट, विभाग नाशिक पश्चिम, एकूण लांबी 3,960 मीटर (3.960 किमी).
युटिलिटी कामांचा प्रगती आढावा
एकूण कार्यक्षेत्र : 9,795 मीटर, कामाचे स्वरूप कार्यक्षेत्र (मीटर) स्थिती ओएफसी व महाआयटी सीसीटीव्ही 1,433 काम प्रगतिपथावर, एमएनजीएल गॅस पाइपलाइन 2,841 काम प्रगतिपथावर, पाणीपुरवठा, 436100 टक्केस्टॉर्म वॉटर ड्रेनेज 4,085 काम प्रगतिपथावर.
सिंहस्थाच्या दृष्टीने येणार्या भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी रस्त्यांची कामे नियोजनबद्ध पद्धतीने केली जात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध होईल.
– मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका
Work on KTHM College Road in final stage
नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…
तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…
रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…
पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…
अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…