नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दहा हजार कोटींची कामे सुरू

मार्च 2027 पर्यंत विकासकामे पूर्णत्वास येणार : आयुक्त शेखर सिंह

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे 25 हजार कोटींहून अधिक विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. त्यांपैकी दहा हजार कोटींंची कामे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सुरू आहेत, अशी माहिती सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. मार्च 2027 पर्यंत प्रमुख पायाभूत सुविधा पूर्णत्वास नेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच सर्व कायमस्वरूपी कामे पूर्ण होतील, तर तात्पुरती कामे सोहळ्याच्या तीन महिने आधी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने टेंट सिटी उभारणी, गोदावरी नदी स्वच्छता अभियान, गर्दी व्यवस्थापन प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, साधुग्राम उभारणी, रिंगरोड निर्मिती, तसेच कुंभमेळ्याच्या ब्रँडिंगवर विशेष भर देण्यात येत आहे.कुंभमेळ्याच्या ब्रँडिंगसाठी आयोजित लोगो स्पर्धेचा निकाल येत्या दहा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी तज्ज्ञ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.स्वयंसेवक व्यवस्थेसाठी भोंसला महाविद्यालयाशी सहकार्य करण्यात येणार आहे. एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. यासाठी लवकरच स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराला दीर्घकालीन पायाभूत सुविधा देण्यावर प्रशासनाचा भर आहे, असे कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.

संवादातून भूसंपादनाचा प्रश्न सोडविणार

भूसंपादनाबाबत काही शेतकर्‍यांची नाराजी असणे स्वाभाविक आहे. आपली जमीन सहज देणे शक्य नसते. मात्र, प्रशासन शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन, योग्य मोबदला देऊन, संवादातून जमीन संपादन करत असल्याचे कुंभमेळा प्राधिकरण आयुक्तांनी स्पष्ट केले.

दर्शनपथ फेज-2 च्या कामांना मंजुरी

त्र्यंबकेश्वर दर्शनपथ फेज- 2 च्या कामांना शासनाने मंजुरी दिली असून, घाटांच्या कामांना सुरुवात झाली आहे. प्रयागराज तीर्थ घाटांचे नूतनीकरणही करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील श्रीनाथ घाट परिसरात 1 मार्चपासून कचरा टाकण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तो कचरा नाशिक महापालिकेमार्फत विल्होळी डेपो येथे वर्ग करण्यात येणार आहे.

द्वारका -नाशिकरोड मार्ग सिंहस्थाआधी पूर्ण

द्वारका ते नाशिकरोड दरम्यान साडेदहा किलोमीटर लांबीच्या दहा पदरी रस्त्याचे काम सिंहस्थपूर्वी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. ओढा, कसबे सुकेणे, नाशिकरोड आणि देवळाली परिसरातील रेल्वे स्थानकांच्या सुविधा वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. या स्थानकांच्या माध्यमातून गर्दी व्यवस्थापन केले जाणार आहे.

साडेअकराशे एकरावर साधुग्रामची निर्मिती

सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी सुमारे साडेअकराशे एकर जागेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी 380 एकर जागा महानगरपालिकेची आहे. उर्वरित जागा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर येथेही सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्यात येणार आहे.

डिसेंबर 2026 पर्यंत सीसीटीव्ही कार्यान्वित

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मार्च ते डिसेंबर 2026 या कालावधीत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. दोन्ही ठिकाणी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्थखात्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

10 minutes ago

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…

16 minutes ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्‍या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…

20 minutes ago

गोदाकाठी सामूहिक शंखनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…

30 minutes ago

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago