शुक्रवारी पहिलीच महासभा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेची पहिली नियमित महासभा शुक्रवारी (दि.20) होत आहे. ही महासभा पाणीपुरवठा, रस्त्याची दुरवस्था आदींसह इतर नागरी समस्यांवरून चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा होत आहे.
महापालिकेत चार वर्षे असलेली प्रशासकीय राजवट नुकतीच संपुष्टात आली आहे. दरम्यान, बुधवारी (दि.18) महापौर निवासस्थान रामायण येथे महापौर हिमगौरी आहेर-आडके व गटनेते अॅड. श्याम बडोदे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी नगरसेवकांनी प्रभागातील प्रलंबित विकासकामांचे प्रश्न मांडताना प्रभागातील अनियमित पाणीपुरवठा आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांच्या समस्या मांडल्या. महासभेत या प्रश्नावर लक्षवेधी प्रस्तावाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा मनोदय काही नगरसेवकांनी व्यक्त केला. त्यामुळे प्रशासनाची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.
पहिल्याच महासभेत शहरातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, दोन-तीन वर्षांपासून रस्त्यांची झालेली दुरवस्था यावरून नगरसेवक लक्षवेधी प्रस्तावाद्वारे चर्चा करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी महापौर व गटनेत्यांकडे केली आहे. दरम्यान, यामुळे महासभेत प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
चार वर्षांचा हिशोब घेतला जाणार
गेल्या चार वर्षांपासून महापालिकेची लोकप्रतिनिधींच्या राजवटीतील पहिली महासभा शुक्रवारी (दि. 20) होत आहे. यावेळी गेल्या पावणेचार वर्षांत लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकीय राजवटीत चुकीच्या पद्धतीने कामे मार्गी लावण्यात आली. त्यासंदर्भातील लेखाजोखा नगरसेवकांकडून मागितला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
सिडको : प्रतिनिधी नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर येथील पोलीस चौकी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून…
नवरदेवाला पेटवून देण्याचा प्रयत्न येवला : प्रतिनिधी प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात भर लग्नमंडपात जोरदार राडा झाला.…
मोदींच्या 139 व्या ’मन की बात’मध्ये ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा विशेष उल्लेख नवी दिल्ली : प्रतिनिधी…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…
नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…
दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…