नाशिक

मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी

मालेगाव : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत कोणताही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापनांना लागू राहणार असून, सुट्टी अथवा सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि. 15 जानेवारीला मतदान होत आहे. मतदानाची घटती टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने मतदार जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी कामातील व्यस्थतेमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतात. लोकशाही बळकटीसाठी मतदान हे प्रभावी हत्यार असल्याने प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी शासन व निवडणूक प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर दुकाने, आस्थापना, हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी संस्था, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी ठिकाणी कार्यरत मतदार कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी देणे बंधनकारक केले आहे. आस्थापनांच्या मालकांनी कामगारांना सुट्टी देऊन आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश दिले असून सुट्टी किंवा सवलत न दिल्याने कुणी मतदानापासून वंचित राहिल्याची तक्रार झाल्यास संबंधित मालकावर कारवाई केली जाईल.
अपवादात्मक परिस्थितीत कामगारांच्या अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका असल्यास, लोकोपयोगी सेवा किंवा अत्यावश्यक आस्थापनांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे अनिवार्य आहे. यासंदर्भात आस्थापना मालकांनी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

24 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

24 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

24 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago