सटाण्यात रंगल्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या
सटाणा ः प्रतिनिधी
स्वर्गीय माजी नगरसेवक दयाराम नाना सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरात देशातील नामांकित मल्लांना पाचारण करून कुस्त्यांचे सामने खेळविले. विजेत्यांना आयोजकांच्या हस्ते मानाची गदा व रोख बक्षीस देऊन सन्मानित केले.
शहरातील पाठक मैदानावर माजी नगरसेवक मनोज सोनवणे मित्रमंडळ, मल्हार रोड युवा प्रतिष्ठान व महाराज स्पोर्ट्स क्लब यांनी आयोजित केलेल्या कुस्ती दंगलीत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील नामांकित कुस्तीगिरांना निमंत्रित करून कुस्त्यांचे सामने पार पडले.
मानाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व हरियाणा केसरी अनिल कुमार यांच्यात झाली. दोघांमधील अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारली. त्यांना स्वर्गीय गोविंद महाराज सोनवणे स्मृतिप्रीत्यर्थ डी. आर. ग्रुप मित्रमंडळाच्या वतीने जाहीर केलेले दोन लाख 51 हजारांंचे रोख बक्षीस व चांदीची गदा देऊन सन्मानित केले. ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजेते विजय चौधरी व पंजाब केसरी बळवंतसिंग यांच्यात सामना खेळविण्यात आला. यात ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विजयी झाले. त्यांना सुखदेव माधवराव पवार यांच्या स्मरणार्थ जाहीर केलेले दोन लाख 51 हजारांचे रोख बक्षीस संतोष भवन, मिरा-भाईंदर (मुंबई) पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजय पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
महिला पहिलवानांच्या झालेल्या कुस्तीत दिल्ली येथील गुढीया व वाराणसी येथील शिवानी यांच्यात सामना रंगला. वाराणसी येथील पहिलवान शिवानी विजयी झाल्या. नांदेड येथील राजू कदम व हरियाणा येथील मोनूसिंग यांच्यातील सामन्यात राजू कदम विजयी झाले. सांगली येथील मनोज कदम व अकोला येथील लखन राजमाने यांच्यात झालेल्या कुस्तीत मनोज कदम यांनी बाजी मारली. लकी थापा व समशेर यांच्यातील सामन्यात थापा याने कुस्ती जिंकली. सांगली येथील निखिल माने व सटाणा येथील साई ढेमे यांच्यात सामना रंगला. निर्धारित वेळेत दोघांमधील रंगत न संपल्याने दोघांना बक्षीस विभागून दिले.
सुनील महाराजन, किरण कर्डिवाल, दादा खन्ना, विलास दंडगव्हाळ, श्रीधर कोठावदे यांनी जाहीर केलेली बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, मिरा-भाईंदर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय पवार, तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, श्रीधर कोठावदे, ज. ल. पाटील प्रमुख पाहुणे होते. आखाड्यात पंच म्हणून क्रीडाशिक्षक चंद्रकांत सोनवणे, नीलेश पाकळे, जिजाबाई सोनवणे यांनी काम पाहिले. सामने रंगात येताच हलगी वाद्य वाजवले जात होते. कुस्त्यांचे समालोचन युवराज केचे यांनी केले. सामने यशस्वितेसाठी माजी नगरसेवक मनोज सोनवणे, दीपक सोनवणे, सागर सोनवणे, राजू खानकरी, अनिल सोनवणे, मुन्ना शेख, रामा पवार, राहुल शेलार, सनी वाघ, बबू सावकार, भूषण बच्छाव, सोनवणे, श्रीपाद कायस्थ, जनार्दन साबळे, शरद शेवाळे, वैभव सावकार, मोन्टी सोनवणे, पंकज सोनवणे, तुषार गाडेकर, अमोल देवरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
इंस्टाग्रामवरून ब्लॅकमेल; अल्पवयीन मुलीकडून लाखोंची वसुली - नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल सिडको विशेष…
नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी पहलगाम (जम्मू-काश्मीर) घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकात दहशतवादी हल्ला…
पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक ः प्रतिनिधी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या आक्रमणाला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे देशभरात…
नांदगावच्या पोखरी जवळ भीषण अपघातात तीन ठार सहा गंभीर जखमी मनमाड : आमिन शेख :…
सुळेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 16) विजांचा कडकडाट,…
नाशिक : प्रतिनिधी शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी शासनाकडून ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली होती. त्यानुसार ई-केवायसी करण्यासाठी…