नाशिकमध्ये दोन दिवस ‘यलो अलर्ट’

नाशिक : प्रतिनिधी
शहरात गुरुवारी दिवसभर रिमझिम पावसाची संततधार सुरू होती. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणार्‍या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात 1.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
रिमझिम पावसामुळे शहरातील रस्ते ओलेचिंब झाले आणि वातावरण प्रसन्न झाले. अनेक ठिकाणी नागरिकांनी पावसाचा आनंद लुटला. मात्र, हा पाऊस शेतीच्या दृष्टीने अद्याप अपुरा मानला जात आहे. पेरणी केलेल्या शेतकर्‍यांना पिकांच्या वाढीसाठी आणि पेरणीची प्रतीक्षा करणार्‍या शेतकर्‍यांना शेतीच्या कामांना वेग देण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही भागांत जोरदार वार्‍यासह पावसाचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहेअतिवृष्टीमुळे पुराचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात असाच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली असल्याने प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या प्रमुख जलस्रोतांपैकी एक महत्त्वाचा असलेला पवई तलाव 1 जुलै 2026 रोजी पूर्ण क्षमतेने भरून दुथडी भरून वाहू (ओव्हरफ्लो) लागला आहे. तलाव क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे अपेक्षेपेक्षा लवकर जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून, यामुळे शहरावरील आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात दूर झाले आहे.

‘Yellow alert’ in Nashik for two days

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *