नाशिक

येवल्याला सलग दुसर्‍या दिवशी पावसाने झोडपले

शेतातील कांदा भिजला, झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित

येवला : प्रतिनिधी
शहरासह परिसरात सलग दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी पाचच्या
सुमारास जोरदार वादळ अन् विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले. तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील येवला ते नांदेसर महामार्गादरम्यान असलेली झाडे उन्मळून पडली, तर वीजपुुरवठा खंडित झाला. शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाट अन् जोरदार वादळासह सलग दुसर्‍या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील कांदे, चारा भिजला, ऊस आडवा पडला, रस्त्यालगत झाडे उन्मळून पडले. कांदाचाळींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळामुळे येवल्यासह तालुक्यातील देवळाणे, अंदरसूल, बोकटे, दुगलगाव परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुगलगाव येथील शेतकरी विश्वनाथ मोरे यांचे जवळपास दोनशे क्विंटल कांदे पावसाने भिजल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे लांबणीवर पडणार असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळामुळे मोठी तारांबळ उडाली. शहरातील महामार्गालगत असलेली झाडे तुफान वार्‍यामुळे रस्त्यावर पडली, तर कांदाचाळीत साठवलेला कांदा पावसामुळे भिजला. शहरात महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली.
देवळाणेत छत कोसळून तीन जखमी
सलग दोन दिवसांपासून अवकाळी व वादळी पावसाने मोठे नुकसान केले. तालुक्यातील देवळाणे येथील जाधव यांच्या घराचे छत कोसळून दोन वृद्ध महिला व लहान मुलगा गंभीर जखमी झाला. घराचे पूर्ण पत्रे उडाले. जखमींवर अंदरसुल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मंत्री छगन भुजबळ यांना मिळताच त्यांनी तातडीने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जखमींची विचारपूस केली. याप्रसंगी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जखमींच्या उपचाराचा खर्च व शासनाच्या माध्यमातून घराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले.

Yeovil lashed by rain for the second consecutive day

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago