शारिरीक, मानसिक आरोग्यासाठी योग उपयुक्त

डॉ. विश्वास मंडलिक : योगशिक्षक संमेलनाचे उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी
सुदृढ, निर्मळ व निकोप आरोग्य ही दुर्मिळ गोष्ट झाली असून, त्यासाठी योग ही अत्यंत उपयुक्त ठरणारी पद्धती आहे. त्यामुळे घरोघरी योग पोहोचविण्याची गरज आहे, इतकेच नव्हे तर प्रत्येक माणसाला योगा शिकणे गरजेचे आहे. याकरिता योगशिक्षकांवर महत्त्वाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन योग विद्या गुरूकुलाचे कुलगुरू व योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांनी केले.
पंचवटी येथील राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आश्रम येथे योगा फाउंडेशन संचलित योगशिक्षक संघाच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महामंडलेश्वर शिवानंद महाराज, स्वामी माधवगिरी महाराज, संमेलनाचे अध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील, स्वागताध्यक्ष डॉ. विशाल जाधव, डॉ. प्रज्ञा पाटील, योग शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, उपाध्यक्ष राहुल येवला, महासचिव अमित मिश्रा, यु. के. अहिरे, डॉ. प्रीती त्रिवेदी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. मंडलिक म्हणाले की, ‘योगा हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी योगा हा योग्य पद्धतीने शिकणे आवश्यक आहे, मात्र तो सध्याच्या काळात विविध पद्धतीने शिकविला जातो. वेगवेगळ्या ग्रंथात योगाचा उल्लेख आढळतो. परंतु योगशिक्षकांनी आणि साधकांनी योग्य पद्धत वापरली तर चांगला परिणाम दिसून येतो. योग आत्म्यापासून परमात्माकडे जाण्याचा मार्ग आहे, तसेच सर्वांगिण व्यक्तिमत्व विकासासाठी योगाचा फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अशोक पाटील म्हणाले की, ‘योगा ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. केवळ योगासने म्हणजे योग नव्हे, तर पतंजली योगमुनींनी प्राचीन काळात योगासनाची माहिती दिलेली आहे. योग हा श्वसनावर आधारित असून त्यात आहाराचा कमी वापर होतो तर अन्य व्यायामांमध्ये हृदयाला गती मिळते. त्यामुळे योग आणि इतर व्यायामातील फरक समजून घेतला पाहिजे. स्वागताध्यक्ष डॉ. विशाल जाधव यांनी, ‘मेडिकल कौन्सिलने देखील योगाला मान्यता दिली आहे. आजच्या काळात तरूणांना म्हणजे पर्यायाने देशाला घडविण्यासाठी योगाचे कार्य मोलाचे ठरणारे आहे. महामंडलेश्वर शिवानंद स्वामी महाराज म्हणाले की, योग ही यशाची गुरुकिल्ली आहे. तसेच जीवनात स्वतःला सावरायचे  असेल तर योगाचे आचरण करा असेही त्यांनी सांगितले. तर डॉ. प्रीती त्रिवेदी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद आणि योगाला जगभरात प्रतिष्ठा मिळविण्याचे कार्य केले. तसेच योगा म्हणजे स्वतःचा शोध घेण्याच्या प्रयत्न आहे.
याप्रसंगी जिवराम गावले यांच्या योगानुभुती स्मराणिकेचे तसेच योगाचार्य कुणाल महाजन यांच्या हटयोग पुस्तकाचे आणि किशन भवर यांच्या योग संजीवनी या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमाचा प्रारंभ किर्ती मंडळाच्या त्रिवार ओंकार व प्रार्थनेने झाला. तर डॉ. तस्मिना शेख व विजय सोनवणे यांनी योग गीत सादर केले. तसेच मंत्र उच्चारण, शंखनाथ, सितारवादन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार योग शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, किशोर भंडारी, मंदार भागवत, कुणाल महाजन, गीता कुलकर्णी, विजय सोनवणे, सीमा ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.
संगीतमय योगाने प्रारंभ
सकाळच्या सत्रात योगासने, योगनिद्रा, प्राणायाम, ध्यान, ॲक्युप्रेशर, संगीतमय योग या विषयावर मनोज नाईक, वसंत काळेकर, अंजली देशपांडे, चंद्रज्योती दळवी, डॉ. तस्मिना शेख, राजेश बाबानी आदींनी मार्गदर्शन केले.
Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

1 day ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 day ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 day ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 day ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 day ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 day ago