आरोग्य

योगोपचार व पंचकोश

गभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतो, तेव्हा योग ही भारताची मौलिक देणगी म्हणून अभिमान वाटतो. पण योग म्हणजे फक्त आसने, प्राणायाम किंवा ध्यान एवढ्यापुरते मर्यादित नाही. योग म्हणजे जीवनशैली आणि योगोपचार म्हणजे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक पातळीवर समग्र उपचार.
योगाचा पाया पंचकोश या संकल्पनेवर आधारित आहे. तैत्तिरीय उपनिषदात वर्णन केलेली ही पंचकोश रचना मानवाच्या अस्तित्वाच्या पाच स्तरांचे दर्शन घडवते.
पंचकोश म्हणजे काय?
मनुष्य म्हणजे केवळ शरीर नाही. सुख, दुःख, आनंद, शोक, कष्ट, मोह, ज्ञान व अज्ञान या सर्वांचा परिणाम त्याला शरीरापासून आतपर्यंत कुठेतरी भोगावा लागतो. कारण मनुष्य पंचकोशात्मक आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश हे पाचही कोश म्हणजे त्याचे वसतिस्थान, संचार स्थान व आंतरिक अनुभविक विश्व होय. आपण वस्त्राचेे धागे जसे विणतो किंवा कोळी जसे स्वतःभोवती जाळे विणतो त्याप्रमाणेच आत्म्याभोवती विणल्या गेलेल्या या पंचकोशात त्याचा मुक्त संचार असतो.
अन्नमयकोेश- शरीराचा भौतिक भाग. स्नायू, हाडे व अवयवांनी बनलेले बाह्य स्थूल शरीर, ज्याचे पोषण अन्नातून होते.
प्राणमयकोश- शरीरातील ऊर्जेचे (प्राणाचे) केंद्र, जे श्वासोच्छ्वासावर आधारित आहे.
मनोमयकोश- मन, भावना आणि विचार यांचा थर. आपल्या कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रियांवर सत्ता गाजविणारे मन म्हणजे तेजोभूत मनोमयकोश होय. विज्ञानमयकोश- विवेक, निर्णयक्षमता आणि आत्मचिंतनाची पातळी. आनंदमयकोश- निःशब्द, स्थिर आणि आनंदी अस्तित्व आत्मानुभूतीची ही अवस्था. योगोपचार हा हळूहळू या सर्व कोशांवर कार्य करतो आणि एकंदर आरोग्य सुधारण्याचा मार्ग मोकळा करतो.
योगोपचार कसा कार्य करतो?
शारीरिक आरोग्य (अन्नमयकोश) ः
योगासनांमुळे लवचिकता, स्नायूशक्ती, पचनक्रिया आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. सांधेदुखी, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवर नियंत्रक प्रभाव दिसून येतो.
ऊर्जा प्रवाह व श्वास (प्राणमयकोश):
प्राणायामाने प्राणशक्तीचा योग्य प्रवाह कार्यान्वित होतो. यामुळेच अनेक मानसिक विकार, थकवा व चिंता यावर उपचार होतात.
मानसिक स्वास्थ्य (मनोमयकोश):
ध्यान, मंत्रजप आणि योगनिद्रा या माध्यमातून मन स्थिर होते. चिंता, नैराश्य आणि अति विचारसरणीवर नियंत्रण मिळवता येते.
विवेकबुद्धी व निर्णयक्षमता (विज्ञानमयकोश):
नियमित योगाभ्यासाने आत्मपरीक्षणाची क्षमता वाढते. नकारात्मक सवयींवर नियंत्रण येते आणि सकारात्मक जीवनपद्धती जोपासली जाते.आत्मिक समाधान (आनंदमयकोश): ध्यान आणि आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेतून मिळणारा आंंतरिक आनंद हा सर्व उपचारांचा कळस ठरतो.
नियमित योगाभ्यासाचे फायदे
शारीरिक व मानसिक रोगांची तीव्रता कमी होते, प्रतिकारकशक्ती वाढते, निद्रानाश, चिंता व तणावावर नियंत्रण, व्यक्तिमत्त्व विकास व भावनिक स्थैर्य, आयुष्यात शिस्त आणि समाधान. योग म्हणजे फक्त उपचार नव्हे, तर आरोग्याची विमा योजना. नियमित योगाभ्यास केल्याने केवळ आजारांवर उपचार होत नाही, तर शरीर, मन व आत्मा यांच्यातील सुसंवाद प्रस्थापित होतो. आधुनिक वैद्यकीय उपचारांबरोबर योगोपचार केल्यास दीर्घकालीन फायदे होतात. योग दिन हे निमित्त आहे, पण योग हा दररोज जगायचा अनुभव आहे. पंचकोशांच्या या समजुतीतून आपण स्वतःला समजून घेऊ शकतो आणि आरोग्य व आनंद यांचा खरा अर्थ शोधू शकतो.

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago