सिडकोत शाळेसमोर युवकावर कोयत्याने वार

भावानेच केले बहिणीच्या प्रियकरावर

धारदार कोयत्याने वार

सिडको विशेष प्रतिनिधी :-पाटील नगरातील पेठे शाळेसमोर मंगळवारी दुपारच्या सुमारास एका तरुणाने हातात कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याच्या घटनेवरुन अंबड पोलीसांनी एका २० वर्षीय तरुणास ताब्यात घेतले आहे दरम्यान प्रेम प्रकरणाच्या वादातून भावानेच बहिणीच्या प्रियकरावर हल्ला केल्याची ही घटना घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एकमेकांनी कोणाही विरोधात तक्रार दिली नाही. मात्र मारहाणीचा व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने  पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या  युवकावर   गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: एक  २० वर्षीय    तरुण दुपारच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील पेठे शाळेसमोर धारदार कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत तसेच सार्वजनिक शांतता भंग करत असल्याच्या परिसरातील काही नागरीकांनी अंबड पोलीस ठाण्यात दुरध्वनीवरुन तक्रारी केल्या त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत धारदार कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत असलेला    युवकाला  ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता त्याच्या दुचाकीच्या डिकीमध्ये चॉपर देखील मिळुन आला याप्रकरणी  तरुणावर     अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत करीत आहेत

पाटील नगर परिसरातील पेठे शाळेसमोर दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने एका 23 वर्षीय    युवकावर चॉपरने वार करून हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता  घडली . या हल्ल्यात युवकाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जखमी झाला आहे. दिवसाढवळ्या टोळक्याकडून मारहाणीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे प्रेम प्रकरणाच्या वादातून भावानेच बहिणीच्या प्रियकर हल्ला केल्याची ही घटना घडली.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एकमेकांनी कोणाही विरोधात तक्रार दिली नाही. मात्र मारहाणीचा व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अंबड पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या व   कोयता बाळगल्या प्रकरणी   तसेच दहशत माजवलेल्या

गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

3 hours ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

1 day ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

1 day ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

1 day ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

1 day ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

2 days ago