नाशिक

पळसेच्या मळे विभागात बिबट्याच्या जोडीची दहशत

नाशिकरोड : प्रतिनिधी
पळसे येथे काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास काही शेतकर्‍यांच्या शेतात बिबट्याची जोडी मुक्त संचार करीत असल्याचे शूटिंग तरुण शेतकर्‍यांनी केले असून, रात्री दिसणारा बिबट्या आता दिवसाही फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
नाशिकरोड शहरापासून अगदीच हकेच्या अंतरावर असणार्‍या पळसे गावातून जाणार्‍या जुना नासाका रस्त्यालगत असणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतात सोमवारी सकाळी भाऊसाहेब जाधव, शरद गायधनी आणि गणेश गायधनी यांच्या गव्हाच्या पिकातून बिबट्याची जोडी अचानक फिरताना दिसून आली.
यावेळी एका शेतकर्‍याची नजर बिबट्यावर गेल्याने त्याने तात्काळ मोबाइलच्या सहाय्याने शूटिंग केले. यावेळी एका पाठोपाठ दोन बिबटे असल्याने या भागातील शेतकर्‍यांमध्ये भीती पसरली असल्याने सोमवारी दिवसभर त्या परिसरात कोणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची शेतीची कामे रखडली होती.पळसे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात शेती असल्याने तसेच बाजूला दारणा नदी असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी कधी सर्व्हिस रोड लगतच्या झाडाझुडपात तर कधी थेट रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होते. बिबट्यांना लपण्यासाठी जागा आणि पिण्यासाठी मुबलक पाणी असल्याने या ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढली आहे. यापूर्वीही गणेश गायधनी यांच्या मळ्यात बिबट्या आढळून आला होता. याबाबत वनविभागाच्या कर्मचार्‍यांना कळविण्यात आले असून, पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
वाढत्या संख्येवर आवर घालावा

“बिबट्या हा वन्यजीव प्राणी असून, त्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांचे निर्बीजीकरण करून वाढत्या संख्येवर आळा घालण्याची गरज असून, रात्रीच्या वेळी हातात काठी घेऊन शेतात गेले पाहिजे.
– गणेश गायधनी, शेतकरी

Editorial Team

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

5 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

26 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

33 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

39 minutes ago