पाथर्डी फाटा परिसरात  युवकावर कोयत्याने वार

पाथर्डी फाटा परिसरात  युवकावर कोयत्याने वार

सिडको विशेष प्रतिनिधी

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगर येथे पाच जणांच्या टोळक्याकडून इयत्ता ११ वीत शिकणा-या महाविद्यालयीन युवकावर जुन्या भांडणाच्या कुरापत काढुन धारदार कोयत्याने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना दामोदर चौकातील नरहरी लॉन्स समोर घडली आहे. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. जखमी युवकाला स्थानिक नागरिकांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश (किशोर) लाटे (वय १९ वर्षे रहा स्वराज्यनगर पाथर्डी गांव) असे गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव आहे.

रंगपंचमीच्या रात्री उपनगर हद्दीत दुहेरी हत्याकांड,दोघा सख्या भावांचा खून

घटनेची माहिती मिळतात इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलिसांचा फौजा फाटा घटनास्थळी दाखल झाला. मारहाण करणाऱ्या संशयतांची काही नावे पोलिसांना समजले असून पोलिसांची विविध पथके संशयीतांच्या मागावर रवाना करण्यात आली आहे. जुन्या वादाच्या कुरापतीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

रंगपंचमीच्या रात्री उपनगर हद्दीत दुहेरी हत्याकांड,दोघा सख्या भावांचा खून
होळी सणाच्या दिवशी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शुभम पार्क भागातील जोसेफ चर्च समोर एका महाविद्यालयीन युवकाच्या खुनाच्या घटनेनंतर पुन्हा एकदा इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दामोदर चौकातील नरहरी लॉन्स समोर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहर आयुक्तालय हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी स्वतः लक्ष घालण्याची नाशिककरांनी मागणी केली आह

 

शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नसून दोन दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावाच्या खुनाची घटना घडली होती, त्यानंतर आज पुन्हा टोळक्याने एका युवकावर वार केल्याने नाशिक मध्ये वर्चस्व वादातून टोळी युद्ध भडकत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *