दिडोरी : प्रतिनिधी
नाशिक (सिडको) शिवपुरी चौकातील वीस वर्षीय युवकाचा दिंङोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजय सरोवर (वय २०) मृत युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोतील उत्तमनगर परिसरातील शिवपुरी चौकात राहणारे नारायण सरोवर हे काल (दि.३०) रोजी सकाळी रामशेज किल्ल्यावर कुटुंबियां समवेत गेले होते. किल्ल्यावर गेल्यावर त्यांचा मुलगा अजय सरोवर (वय २०) चक्कर येऊन पडला. त्यानंतर त्याला तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अजय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचे वडील नारायण सरोवर यांचा फळे विक्रीचा व्यवसाय आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…