मधुरा घोलप
मोबाइल गेम खेळण्यावरून आई रागावल्याने अल्पवयीन मुलाची आत्महत्या ही वार्ता वाचून मन सुन्न झालं. युवक म्हणजे सळसळतं रक्त! देशाचं भविष्य! पण हीच तरुणपिढी मोबाइल गेमच्या विळख्यात अडकलेली दिसतेय. पूर्वी विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जायचे. मोकळ्या हवेत मित्रांसोबत खेळ खेळताना शरीराला व्यायाम आणि मनाला ऊर्जा मिळायची. खिलाडूवृत्ती वाढीस लागायची. शिवाय, त्याच मित्रांबरोबर घरबसल्या बैठे खेळ खेळण्यातून आणि एकत्र अभ्यास करण्यातूनही मैत्रीचं नातं आणखीनच घट्ट व्हायचं. पण आता सगळ्यांच्याच हातात मोबाइल आल्यापासून प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या आहेत. आता मैदानेही कमी झाली आहेत आणि जी आहेत तीही आता ओस पडलेली दिसतात.
एकत्र येऊन सगळ्यांबरोबर खेळ खेळण्याविषयी अनास्था निर्माण होऊन हातातल्या मोबाइलच्या आडव्या स्क्रिनवर दिसणार्या इवल्याशा मैदानावरच आज क्रिकेट, खो-खो, कबड्डीचे सामने रंगताना दिसताहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे तर अगदी लहान मुलांनाही मोबाइल द्यावा लागतोय. पण सतत मोबाइल गेम खेळण्याने कमी वयातच जागरण, डोळ्यांचे आणि पाठीचे विकार जडणे, एकाग्रता कमी होणे, स्थूलपणा अशा समस्यांना तरुणाईला तोंड द्यावे लागते आहे. त्याचे अभ्यासावरही विपरीत परिणाम होताना दिसताहेत.
मोबाइल आणि त्यावरचे हे खेळ हेच एक व्यसन झालं आहे. झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून मोबाइल गेम्समध्ये आर्थिक गुंतवणूकही केली जाते. त्यात यश मिळालं तर पैशांचा लोभ वाढत जाऊन अशी व्यसनाधीनता वाढतच जाते. तर दुसरीकडे त्यातील अपयशामुळे नैराश्यग्रस्ततेचे प्रमाणही युवकांमध्ये वाढते आहे.
मूत्रपिंडाचा कर्करोग लक्षणे आणि उपचार
करमणुकीच्या नावाखाली या आभासी जगातल्या खेळांच्या आहारी जाऊन प्रत्यक्ष वास्तवाचे भान विसरून कितीतरी तरुण आपल्या राहत्या ठिकाणापासून दुसर्याच कुठल्यातरी ठिकाणी नकळत जाऊन पोहोचल्याच्या वार्ता तर आपण रोजच ऐकतो आहोत. एवढंच नाही, तर काही मोबाइल गेम्समध्ये तर जीवावर बेतणारी कृत्ये करायला सांगितली जातात. ते करण्यातच खरं धाडस आहे. अशा चुकीचा विचार करून त्यापायी कित्येक तरुण आपला जीवही गमावून बसलेत.
‘अति तिथे माती’ या म्हणीनुसार कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे अशा तरुणपिढीची बुद्धी, शक्ती आणि सद्सद्विवेक मोबाइल गेममुळे व्यर्थ जाऊ न देता त्यांचा विधायक कामासाठी उपयोग करायला हवा.
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…