नाशिक

प्रेमसंबंधाच्या संशयातून विहिरीत ढकलून तरुणाचा खून

चांदवड पोलिसांकडून दोन संशयितांना अटक

चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील तळेगावरोही शिवारातील एका विहिरीत 19 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळून आल्याच्या घटनेचा चांदवड पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणामागे प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेला खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तळेगावरोही येथील शरद अशोक वाकचौरे (वय 19) हा तरुण 22 मे रोजी रात्री शिवारातील एका विहिरीत मृतावस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले होते. या प्रकरणी सुरुवातीला चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता.
पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, रोशन तुकाराम वाकचौरे (वय 27) याला शरदचे त्याच्या परिचयातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने सचिन दत्तात्रय गाडे (वय 23) याच्या मदतीने शरदचा काटा काढण्याचा कट रचला. ट्रॅक्टरसाठी डिझेल आणण्याच्या बहाण्याने शरदला शेतात बोलावून घेण्यात आले.
त्यानंतर या दोघांनी मिळून त्याला विहिरीत ढकलून दिले. पाण्यात बुडाल्याने शरदचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे.
या धक्कादायक घटनेनंतर मृत शरदचे वडील अशोक शिवाजी वाकचौरे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रोशन वाकचौरे आणि सचिन गाडे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Youth murdered by being pushed into a well over suspicion of a romantic affair.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago