सिडको : विशेष प्रतिनिधी
गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील देशमुख वस्ती येथे एका 20 वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस हस्तगत केले. याप्रकरणी आरोपीविरोधात हत्यार कायदा व महाराष्ट— पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य राजेंद्र पाटोळे (वय 20, रा. निशांत गार्डन, धात्रक फाटा, नाशिक) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून, तो करण जनरल स्टोअर, देशमुख वस्ती, म्हसरूळ-आडगाव लिंक रोड या परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार कल्पेश राजेंद्र जाधव (पोअं 2255) व पोहवा वसावे, मलंग गुंजाळ यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूच्या कमरेस पुढील बाजूस 30हजार रुपये किमतीचे एक सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल व 1 हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस सापडले. संशयित आदित्य पाटोळे याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले असून, तो पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग करत होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वपोनि सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…