नाशिक

म्हसरूळ येथून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

सिडको : विशेष प्रतिनिधी
गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील देशमुख वस्ती येथे एका 20 वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस हस्तगत केले. याप्रकरणी आरोपीविरोधात हत्यार कायदा व महाराष्ट— पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य राजेंद्र पाटोळे (वय 20, रा. निशांत गार्डन, धात्रक फाटा, नाशिक) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून, तो करण जनरल स्टोअर, देशमुख वस्ती, म्हसरूळ-आडगाव लिंक रोड या परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार कल्पेश राजेंद्र जाधव (पोअं 2255) व पोहवा वसावे, मलंग गुंजाळ यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूच्या कमरेस पुढील बाजूस 30हजार रुपये किमतीचे एक सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल व 1 हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस सापडले.  संशयित आदित्य पाटोळे याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले असून, तो पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग करत होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वपोनि सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago