आई मनीषा पाटील आणि वडील सुनील पाटील यांची मुलगी मृणाल पाटील. मूळची जळगावची . जन्म पुण्यात झाला. नंतर 2 री पर्यंतचे शिक्षण पुण्यात घेतले. त्यानंतर पुढचे शिक्षण नाशिक मध्ये पूर्ण केले. वडील सरकारी अधिकारी होते व आई गृहिणी. त्यानंतर नाशिकच्या बीवायके महाविद्यालयात कॉलेज चे शिक्षण पूर्ण केले.अकरावीत असताना अल्पशा आजाराने वडिलांचं निधन झालं . आणि सुरुवात झाली संघर्षाची .
लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. शाळेतील शिक्षकांनी हा गुण हेरला व लिखाणासाठी प्रेरणा दिली . आपण लिहिलेले लेख वर्तमान पत्रात प्रसिद्ध व्हावे अशी इच्छा होती . सुरुवातीला अनेक ठिकाणी लेख नाकारले गेले. खूप दुःख झाले . नैराश्य आलं . परत काही लिहायचंच नाही असं ठरवलं .पण आतला लेखक स्वस्त बसू देत नव्हता, त्यामुळे प्रयत्न चालू ठेवले . आणि ते म्हणतात ना ’ जेव्हा देव एक दरवाजा बंद करतो, पण दुसरा उघडा करतो. ’ त्याच प्रमाणे मैत्रीण बागेश्री पारनेरकर , सागर आहेर हे मित्र भेटले व लेखांना प्रसिद्धी मिळण्यास मदत झाली . जीजू ड. पंकज पाटील यांचं मृणाल मला तुला एका मोठ्या साहित्यिककांमध्ये पहायचं आहे, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय तू थांबायचं नाही. हे वाक्य 10 हत्तीचं बळ देऊन जात होतं . .
मॉडेलिंग आणि मृणालचा दूर दूर पर्यंतचा संबंध नव्हता . चार्टर्ड अकाउंटंट बनण्याची तीव्र इच्छा होती . पण वडिलांच्या निधनानंतर आर्थिक अडचणीसह इतर काही कारणास्तव चार्टर्ड अकाउंटंट चे शिक्षण पूर्ण करता आलं नाही . एके दिवशी सहजच युट्युब वर फॅशन शो बघत असताना तिच्या मनात विचार आला की आपण पण हे करू शकतो का? आणि ह्या एकाच प्रश्नाने मॉडेलिंग क्षेत्रातील करियरच्या वाटेवर पाय ठेवले . एक एक करत छोटे छोटे फोटोशूट करायला सुरुवात केली . एके दिवशी एक संधी चालून आली. नाशिकमध्ये ’ चळीी परीहळज्ञ शश्रशसरपीं 2019 ’ या फॅशन शो मध्ये भाग घेतला . आत्मविश्वासाची कमी असल्याने मनात न्यूनगंड तयार झाला होता . पण मार्गदर्शक सैय्यद सर देवदूत बनून शब्दरूपी आधार देऊन प्रेरणा दिली . स्पर्धेत जिंकणं किंवा हारणं हे दोन पर्याय होते पण त्यातून आत्मविश्वास वाढणार होता . हिंमत करून शो मध्ये सहभाग घेतला. आणि मेहनत व आत्मविशवास फळाला आला. त्यात ’इशीीं डाळश्रश Aुरीव’ हे टायटल बरोबरच शो ची विनर झाली . त्यानंतर ढहश ॠश्रर्रोीी ऋरलश जष छरीहळज्ञ’ हे ही जिंकलं . महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना नोकरीही चालू होती . तसेच लहान मुलांसाठी शिकवण्या घेणं ही सुरू होतं. वडिलांच्या निधनानंतर मानसिक दृष्ट्या खचून आपण भविष्यात काही करू शकत नाही हा न्यूनगंड प्रचंड प्रमाणात निर्माण झाला . याच काळात सख्ख्या बहिणीसारखी जवळची मैत्रीण अंकिताने धीर दिला, मृणाल तू खूप काही करू शकते, आणि तू खूप मोठ्या यशोशिखरावर जाणार हा माझा विश्वास आहे. अंकिताचे हे शब्द सकारात्मकतेकडे नेऊ लागले अन तिथून खरी आयुष्याला कलाटणी मिळाली .
वडिलांच्या प्रेरणेने सामजिक कार्याची आवड निर्माण झाली. लहान असताना समाज कार्य काय असत, नेमेक कस करायच असत ते काहीच समजत नव्हतं . परंतु समाजात वावरताना ओळखी वाढत गेल्या अन समाज कार्य करताना अनेक सामाजिक कार्यर्त्यांच्या प्रेरणेने सकारात्मक ऊर्जा मिळाली .
ध्येयाच्या वेदना मनाला होउ दे
वार तुझ्या प्रत्येक क्षणास होऊ दे,
अशक्य सुद्धा म्हणेन शक्य आहे,
इतका गर्व तुझ्या बुद्धीच्या मीपणास होऊ दे !
याप्रमाणे कार्याची दखल घेऊन मृणाल ला अनेक संस्थांकडून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .
लहान असतानाच वडिलांचे छत्र हरवले . आईने प्रत्येक पावला पावलावर साथ दिली . मी लेखन क्षेत्रात जे काही नाव कमावलं आहे, त्याचे पूर्ण श्रेय हे माझ्या आईचे आहे , असे मृणाल म्हणते .
मृणालच्या कामाची दखल घेऊन नाशिक चे प्रसिद्ध रेडिओ विश्वास 90.8 ,राजस्थान मधील मधूबन रेडिओ स्टेशन वर देखील मृणाल यांच्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहे. तसेच मृणाल ला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई च्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श युवती महाराष्ट्र युथ आयडॉल विशेष गुणरत्न पुरस्कार..2020,दि महाराष्ट्र एज्युकेशन संस्था, चांदोरी च्या वतीने महिला सन्मान पुरस्कार..2020,लायन्स क्लब नाशिक च्या वतीने महिला दिन विशेष पुरस्कार..2020,दलित आदिवासी क्रांती दल, महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तीय युवा संघर्ष पुरस्कार2021,श्री साई बहुउद्देशीय संस्थेकडून राष्ट्रीय अहील्यारत्न पुरस्कार 2021,राज्यस्तरीय कोविड योद्धा समाज रक्षक महासन्मान 2021,राष्ट्रीय समाज गौरव गोल्ड मेडल अवॉर्ड 2021,क्षितिजा महिला सन्मान 2021,राष्ट्रीय भारत रत्न गोल्ड मेडल अवॉर्ड 2021,जिजाऊ गौरव पुरस्कार 2022,कसमादे गौरव पुरस्कार 2022,जिजाऊ मॉं साहेब ळपींशीपरींळेपरश्र र्िीेीव ुेारपळर रुरीव 2022,द इंडिया आयकॉन अवॉर्ड 2022 फ्रॉम छकठज ऊशश्रहळ,डेलळरश्र डींरी चशवळर रुरीव 2022,राज्यस्तरीय कर्मयोगी पुरस्कार 2022 हे पुरस्कार मिळलेले आहे.
-माधुरी रोहम
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…
बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…
View Comments
Mast