नाशिक

महावितरणतर्फे शून्य थकबाकी मोहीम

100 टक्के वसुली करण्याचे संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

♦ शहरात आढावा बैठक.
♦ मार्चएंडपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट.
♦ वीजबिल न भरल्यास जोडणी होणार कट.

नाशिक : प्रतिनिधी
महावितरणच्या आर्थिक सक्षमतेसाठी ग्राहकांना पुरवलेल्या प्रत्येक युनिटचा मोबदला मिळणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने मार्चअखेर सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडील थकीत व चालू वीज देयकांची 100 टक्के वसुली करण्यासाठी मार्च मिशनअंतर्गत शून्य थकबाकी मोहीम युद्धपातळीवर राबवावी, असे स्पष्ट निर्देश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी विद्युत भवन येथे दिले.
नाशिक परिमंडळातील वसुली मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंत्यांंच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. बैठकीत नाशिक मंडळातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक व इतर सर्व वर्गवारीतील थकबाकीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
मार्च संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने मार्च मिशनअंतर्गत सर्व देयके वसूल करून शून्य थकबाकीचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत. वारंवार आवाहन करूनही वीज देयकांचा भरणा न करणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या बैठकीला नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, पायाभूत आराखडा मंडळाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर, अधीक्षक अभियंता राजेश थूल, तसेच शहरातील कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते व नाशिक परिमंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात येईल. मात्र, वसुलीच्या कामात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष करणार्‍यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही संचालक पवार यांनी दिला. थकबाकी वसुलीच्या कामासाठी अभियंते व कर्मचार्‍यांनी कार्यालयात वेळेत उपस्थित राहून दैनंदिन कामाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Zero arrears campaign by Mahavitaran

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago