नाशिकसह जिल्हावासियांनी घेतला शुन्य सावली दिवसाचा अनुभव

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हयात काल शुन्य सावली दिवस असल्याने नागरिकांनीही सावलीनेही साथ सोडल्याचा अनुभव घेतला.सावली ही मनुष्याची साथ कधीच सोडत नाही असे मानण्यात येते. पण कालच्या दिवस या गोष्टीला अपवाद ठरला. नागरिकांनीही दुपारच्या वेळी सुर्य प्रकाशाच्या प्रखर किरणात उभे राहून सावलीनी साथ सोडल्याचा अनुभव घेतला. या निमीत्ताचे औचित्य साथत सावलीने साथ सोडल्याचे फोटो स्टेटसला टाकत अपडेट करण्यात आले.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणार्‍या  सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज 0.50 अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. 3 मे पासून सुरू झालेला शुन्य सावली दिवस 31 मे पर्यंत  राज्यातील विविध भागात अनुभवता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *