नाशिक : वार्ताहर
निवडणुका आयोगाच्या निर्देशानुसार 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रारूपरचना कार्यक्रम जाहीर झाला असून, काल जिल्हाधिकारी कक्षात प्रारूप चनेची अधिसूचना जिल्हाधिकार्यांमार्फत प्रसिद्ध करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या गट व गणविषयक प्रारूप रचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरील हरकती व सूचना नोंदविण्याचा कालावधी 8 जूनपर्यंत असून, ज्या कुणाला कुणाच्या हरकती किंवा सूचना नोेंदवायच्या असतील त्यांनी त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपावेतो नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 8 जूननंतर प्राप्त झालेल्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
जिल्हा परिषद क्षेत्रातील गट अणि पंचायत क्षेत्रातील गणांविषयी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन तद्नंतर विभागीय आयुक्तांतर्फे योग्य तो निर्णय घेण्यात येऊन निवडणूक विभाग/
निर्वाचक गणरचना अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर 27 जून रोजी अंतिम प्रारूपरचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरंदकर यांच्यामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूपरचना कार्यक्रमाविषयी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…