श्रीलंकेत उपासमार, भारताकडून तांदूळ

श्रीलंकेत उपासमार, गंभीर आर्थिक संकट
भारताकडून ४० हजार टन तांदळाची मदत

नवी दिल्ली:- आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या श्रीलंकेत उपासमार सुरू झाली असून, भारताने या देशाला तातडीची मदत म्हणून 40 हजार टन तांदूळ पाठविला आहे.
भारताच्या शेजारील श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला असून, गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. विदेशी चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आला असून, हा देश इतर देशांच्या कर्जखाली दबला आहे. दिवाळखोरीच्या संकटातून बाहेर श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी अनेक देश पुढे आले आहेत. त्यात भारताची भूमिका सर्वात मोठी आहे. अन्न संकट
संपवण्यासाठी भारताने 40 हजार टन तांदूळ पाठवून दिलासा दिला आहे.
श्रीलंकेत प्रचंड महागाई वाढली असून, लोकांनी राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले आहे. राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. सरकारविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. लोकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
भीषण आर्थिक संकट आणि निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली असून, संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की, लोकांवर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. पेट्रोलपेक्षाही दूध महाग झाले आहे. एक कप चहाची किंमत 100 रुपये, तर मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. बटाटे 200 रुपये किलाे झाले आहेत. वीजनिर्मितीवरही परिणाम झाला असून, अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *