रुई शिवारात कालव्यात बुडून वृद्धाचा मृत्यू

लासलगाव  वार्ताहर

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर जलद पाटाच्या कालव्यात सात मोरी रुई गावाच्या शिवारात एका ७१ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती लासलगाव पोलिसांनी दिली आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की रुई येथील पोलीस पाटील योगेश गुरुळे यांनी दिलेल्या खबरी नुसार रुई गावातील दत्तू भिकाजी तासकर वय वर्षे ७१ यांचा मृतदेह नांदूरमधमेश्वर जलद पाटाच्या कालव्यात सात मोरी रुई गावाच्या शिवारात आढळून आला आहे. घटनास्थळी लासलगाव पोलिसांनी तात्काळ धाव घेत पंचनामा करत याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेतील पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मुरडणर करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *