शेतकर्यांपुढे नवीन संकट; आर्थिक नियोजन कोलमडले
लासलगाव : वार्ताहर
शेतकरी आधीच अतिवृष्टी, बाजारभावातील अनिश्चितता अशा संकटांना तोंड देत असताना, आता रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकर्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. ऐन हंगामात अचानक दरवाढ झाल्याने शेतकर्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खतांमध्ये प्रतिबॅगमागे 200 ते 300 रुपये इतकी दरवाढ झाली आहे.
विविध मिश्र खतांचे दर वाढले, परंतु शेतीमालाचे भाव अजूनही म्हणावे तसे वाढले नाहीत. कांदा, कापूस, सोयाबीन, भाजीपाला अशा प्रमुख पिकांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्यांना हंगामाचा हिशेब जुळवणे कठीण झाले आहे. आता रब्बी हंगाम पुढे येऊन ठेपला आहे. गहू, हरभरा आदी पिकांना खताची गरज भासणार आहे. येणार्या काळात अजूनही पुन्हा खताच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कृषी विक्रेत्यांना विविध कंपन्यांकडून खतांसोबत वॉटर सोल्यूबल खते, मायक्रोला, मायक्रोराइझा आदींचे लिंकिंग केले जाते. शेतकर्यांकडून या लिंकिंग प्रॉडक्टचा उठाव नसल्याने तो माल इतर खतांसोबत माथी मारला जातो. युरिया खत 266 रुपयांवर विक्री करू नये, असे निर्देश आहे. परंतु, युरिया वाहतुकीसाठी भाडे देत नसल्याने प्रत्येक पोत्यामागे दहा ते वीस रुपये जादा दराने दुकानदारांना नाइलाजाने विक्री करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया दुकानदारांनी दिल्या आहेत. जादा दराने विक्री झाल्यास शेतकर्यांकडून ही ओरड केली जाते. लिंकिंगमुळे दुकानदारांकडूनही मोजक्याच खताचा उठाव केला जातो. उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतकर्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. उत्पादन खर्चात सर्वांत महत्त्वाचा घटक असणार्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेतीक्षेत्र आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. केंद्र सरकारने खतांचे दर कमी करावे, असे शेतकरी सुनील गवळी यांनी सांगितले.
रासायनिक खतांचे प्रकार आणि वाढलेले दर
रासायनिक खते जुने दर वाढीव नवे दर
10:26:26 1725 1925
15:15:15 1450 1650
20:20:0:13 1300 1500
16:16:16 1475 1600
24:24:00 1850 1900
08:21:21 1800 2150
9:24:24 1850 2100
म्युरेट ऑफ पोटॅश 1525 1800
14:35:14 1700 1800
12:32:16 1750 1850
रासायनिक खतांच्या दरात झालेली वाढ ही केंद्र सरकारच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणांचा पुरावा आहे. वास्तविक 2014 पासून केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर अगोदरच रासायनिक खतांचे दर हे कित्येक पटींनी वाढले आहे. त्यात आता नव्याने झालेली ही वाढ शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. सरकारने रासायनिक खतांचे दर कमी करून शेतकर्यांना योग्य प्रकारे खत वापरण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. शेतीमालाचे बाजारभाव वाढवण्याची गरज असताना रासायनिक खतांचे दर वाढवून शेतकर्यांची फसवणूक सुरू आहे.
-सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, काँग्रेस नेते
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…