पंचवटी, नाशिकरोड, सिडकोत गुन्हे दाखल
पंचवटी : प्रतिनिधी
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी हाती ’नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेत आता बेशिस्त, वाहतुकीला अडथळा ठरणार्या रिक्षा चालकांनाही कायद्याचा हिसका दाखवण्यास सुरुवात केली आहे. दिंडोरी नाका या अत्यंत वर्दळीच्या चौकात मनमानीपणे रस्त्यात रिक्षा उभी करणार्या 13 रिक्षाचालकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
रिक्षा व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीने शिरकाव केला आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये रिक्षा चालकांचा सहभाग उघड झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता गुन्हेगारांना कायद्याचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. रिक्षाचालक प्रसाद रवींद्र वाघ, सुनील राजेंद्र जाधव, राहुल मगन लहामगे, गिरीश भास्कर बाविस्कर, सतीश राजू जाधव, मुरलीधर सीताराम दांडगे, विकी नवनाथ गिरीटकर, संतोष राजाराम पगारे, संतोष अशोक मोहिते, विशाल राजू माने, योगेश दिलीप साबळे, अजिंक्य भारत चहाळे, मनोज काशीनाथ धुमाळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 285 व मोटार वाहन कायदा कलम 21 (20)/177 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात महेश दादाजी जाधव या टॅक्सीचालकाविरुद्ध रहदारीला अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ गौतम अहिरे (रा. नांदुरी) याने ठक्कर बझार परिसरात रस्त्याच्या मध्यभागी टॅक्सी उभी करून रहदारीला अडथळा निर्माण केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
भोसला मिलिटरी स्कूलमागे सुनील शिंदे या रिक्षाचालकाने भररस्त्यात रिक्षा उभी केल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली.
याशिवाय सातपूर येथील अजय लहानू गांगुर्डे (रा. अशोकनगर) याने एमएच 15- ई्यएच 1461 ही रिक्षा कार्बन नाका येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. अशोकनगर येथील महिंद्रा गेटजवळील भररस्त्यात रिक्षा उभी केल्याने राकेश सतीश मांडोळे या रिक्षाचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.
महादेववाडी येथील रिक्षाचालक भास्कर शिंदे यांच्यावरही भररस्त्यात रिक्षा उभी केल्याने गुन्हा नोंदविला. शहरात पोलिसांनी रिक्षाचालकांविरोधातील कारवाईमुळे किमान आता शहरातील रिक्षाचालकांना शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…
बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…