भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणपतीच्या पूजेत पत्रीपूजनाला महत्त्व आहे. या पत्रीपूजनात गणपतीला 21 वनस्पती वाहायल्या जातात. या पत्रीपूजनाच्या निमित्ताने कितीतरी वनस्पती आपण पहिल्यांदा पाहतो. ज्या पत्री गणपतीला प्रिय असतात त्या आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाच्या असतात. या पत्रींचे आपल्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व लक्षात यावे यासाठी खरंतर हे पत्रीपूजन.
या पत्री गणपतीला वाहताना या वनस्पतींना ओळखणं, त्यांचे गुण जाणून घेणं आणि आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या वनस्पती जास्तीत जास्त प्रकारे आपल्या परसबागेत, अंगणात, गॅलरीतील कुंड्यात कशा लावता येतील याचा विचार होणं, तशी कृती होणं अपेक्षित आहे. या वनस्पती हाताशी असल्या की छोट्या-छोट्या आरोग्यविषयक तक्रारी घरच्या घरी दूर होतात इतके गुणधर्म या 21 प्रकारच्या वनस्पतींत गणपती पूजेत वापरल्या जाणार्या या पत्रींमध्ये औषधी गुणधर्म असतात, जे मानवी आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. या सर्व वनस्पतींमधली औषधी गुणवत्ता वर्षाऋतूच्या काळात अधिक असते. याच काळात उद्भवणार्या अनेक विकारांवर त्या उपयुक्तही आहेत. त्यांच्या सान्निध्यात आपण राहावे, त्या वनस्पतींचे योग्यरीतीने जतन, संगोपन करावे, हा त्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन आपल्या पूर्वजांना नक्कीच ज्ञात असावा.
वनस्पतींमधील वैविध्य, विविधता जपली तर सृष्टीतल्या अनेक उपयुक्त घटकांचे चक्र नैसर्गिकरीत्या अव्याहतपणे चालू राहते आणि सृष्टीचा तोलही सांभाळला जातो. गणेशाला अर्पण करण्यात येणार्या 21 वनस्पतींमध्ये जमिनीलगत वाढणार्या, झुडपांपेक्षाही लहान झुडपं, मध्यम व मोठ्या उंचीचे वृक्ष, लता व वेली आहेत.
एकविशंति पत्रिका असेही म्हणतात. या पत्रींमध्ये दूर्वा, माका, तुळस, शमी, बेल, आघाडा, कण्हेर, कदंब, अर्जुन, धोतरा, मंदार, पिंपळ, जाई, जुई आणि इतर पाने यांचा समावेश होतो. प्रत्येक पत्री गणपतीला अर्पण करण्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे; परंतु या पत्रींमध्ये असलेले औषधी गुणधर्म आयुर्वेदात विशेष स्थान राखतात. आयुर्वेदात या पत्रींचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी केला जातो.
पत्रीपूजेत पहिला मान दूर्वांचा. जमिनीलगत पसरत वाढणार्या, गवत प्रकारातल्या दूर्वांचे त्रिदल यांचे नाते हिंदू धर्मात पवित्र मानतात. शरीरातल्या अतिरिक्त कडकीमुळे उद्भवणार्या अनेक विकारांवर दूर्वा उपयुक्त आहेत.
त्यांना प्रजोत्पादक आणि आयुष्यवर्धक मानले आहे. दूर्वांची मुळे माती आणि जमिनीतले पाणी घट्ट धरून ठेवतात, जमिनीत ओलावा टिकून राहतो. मातीतल्या सजीव सृष्टीला जीवनदान मिळते!
तुळस ही गणपती पूजेत वापरली जाणारी पवित्र पत्री आहे. तुळशीत अँटिऑक्सिडंट आणि अॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ती सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहे. तुळशीचा काढा घशातील खवखव आणि तापावर गुणकारी आहे.
बेलपत्र गणपतीसह शिवपूजेतही वापरले जाते. बेलपत्र पचनसंस्थेसाठी उत्तम आहे. यकृताचे विकार, बद्धकोष्ठता आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बेलपत्राचा रस किंवा चूर्ण मधुमेह आणि पोटाच्या समस्यांवर उपयुक्त आहे.
शमी पत्री गणपतीला अर्पण केल्याने विघ्ने दूर होतात अशी श्रद्धा आहे. शमीची पाने आणि खोड रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि जखम बरे करण्यासाठी वापरले जाते. शमीला सुप्त अग्नी देवता असं म्हणतात. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी आहे.
पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते आणि त्याची पाने गणपती पूजेत वापरली जातात. पिंपळाची पाने दमा, खोकला आणि त्वचेच्या विकारांवर उपयुक्त आहेत.
या वनस्पती यापुढेदेखील महत्त्वाच्या असतात. कारण की, पुढे सप्टेंबर संपून ऑक्टोबर लागतो. पाऊस कमी होतो. ऑक्टोबर हिट सुरू होते आणि पित्ताचे त्रास उफाळून येतात. डोकं दुखणं, डोळे जळजळणं, अॅसिडिटी होणं, मळमळणं, उलटी होणं असे त्रास सुरु होतात. 21 वनस्पतीतल्या कितीतरी वनस्पती खास या आजारावर उपचारासाठी उपयोगी पडतात.
म्हणून आयुर्वेद म्हणतं या एकवीस वनस्पतींतील ज्या ज्या वनस्पती आपल्याला शक्य आहे तेवढ्या लावाव्यात, जोपासाव्यात आणि त्यांचा उपयोग करावा. किमान तुळस, आघाडा, दूर्वा, बेल, मधुमालती, डाळिंब या वनस्पती आपल्या दारात असायलाच हव्यात.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…