नाशिक

बसस्थानक अपघात प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर बसस्थानकात बसचे प्रेशर ब्रेक नादुरुस्त होऊन बस फलाटावर चढून झालेल्या अपघातात आदर्श योगेश बोराडे (9) या चिमुकल्याचा बुधवारी (दि.19) सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत मुलाच्या आजोबाने सिन्नर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आगारप्रमुख हेमंत नेरकर यांच्यासह चालक, कार्यशाळाप्रमुख, पाळीप्रमुख व वाहनांची देखभाल करणारा कर्मचारी या पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मृत आदर्श याच्यावर बुधवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्याचे आजोबा ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव (57, रा. तामकडवाडी, ता. सिन्नर) यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी चालक ज्ञानेश्वर चंदू बनगैया, आगारप्रमुख हेमंत नेरकर, कार्यशाळाप्रमुख दिगंबर पुरी, पाळीप्रमुख रईस व वाहनांचा देखभाल करणारा कर्मचारी अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली के. टी. खैरनार तपास करीत आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आदर्श योगेश बोराडे, त्याची आई, आजी व आजोबा हे देवदर्शन करून सिन्नर बसस्थानकावर उतरल्यानंतर दापूर येथे जाण्यासाठी फलाटवर उभे होते. यावेळी सिन्नर-देवपूर बस डेपोतून फलाटावर लावत असताना तिचे ब्रेक फेल झाल्याने ती थेट फलाटावर चढली. या अपघातात नऊ वर्षांचा आदर्श चिरडून ठार झाला होता तर अन्य तीन जण जखमी झाले होते. यानंतर संतप्त नागरिक व नातेवाइकांनी बसस्थानकासमोर नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर विभागीय वाहतूक अधिकारी कल्याणी ढगे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोषींवर कारवाई करण्यासह भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.

चौकशी समितीची स्थापना…

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी नाशिक प्रदेशचे प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे यांनीही सिन्नर येथे धाव घेऊन दुर्घटनेबाबत माहिती घेतली. घटनेसंदर्भाने आगारप्रमुख व विभागीय अधिकार्‍यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय वाहतूक अधिकार्‍यांकडून तिघांचे निलंबन

डेपोमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या बससंदर्भात लॉगसीटमध्ये जो रिमार्क असतो, त्यावर कार्यवाही झाली किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी वाहन परीक्षक आणि पाळीप्रमुखांवर असते. तर वाहन सुस्थितीत आहे किंवा नाही हे बघून घेण्याची जबाबदारी चालकावर असते. मात्र, या तिघांनीही कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल उपयंत्र अभियंता प्रसाद देसाई यांनी विभागीय वाहतूक अधिकारी कल्याणी ढगे यांना पाठवला. गुरुवारी त्यांनी सिन्नर आगारातील वाहन परीक्षक विलास लक्ष्मण केदार, पाळीप्रमुख अब्दुल रईस अब्दुलगणी आणि चालक ज्ञानेश्वर चंद बनगैया या तिघांवरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago