नाशिक

दोडीत विहिरीत आढळला मृत बिबट्या; मोहदरी वनोद्यानात अग्निडाग

तीन दिवसांपूर्वीच पडला असल्याचा अंदाज

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील दोडी बुद्रुक शिवारात गुलतुर्‍यांनी वेढलेल्या विहिरीत पडून बिबट्या मृत झाल्याची घटना गुरुवारी (दि.20) उघडकीस आली. दरम्यान, हा एक-दीड वर्षाचा नर बिबट्या तो दोन ते तीन दिवसांपूर्वीच विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बिबट्या अक्षरश: कुजलेल्या अवस्थेत होता.
दोडी बुद्रुक येथील मारुती शिंदे व महादू शिंदे यांची गट नंबर 90 मध्ये सुमारे सहा ते सात परस खोल विहीर आहे. विहिरीभोवती सिमेंटचे कडे बांधण्यात आले आहे. विहीर जवळपास पाण्याने पूर्णपणे भरलेली असून, तीन ते चार फूट रिकामी होती. या विहिरीच्या कडेला असलेले गुलतुर्‍याची झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे झाडांचा अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवला आहे.
महादू शिंदे हे गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास विहिरीभोवती वाढलेली गुलतुरे तोडण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या मृतावस्थेत तरंगलेला आढळून आला.
त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, वनपाल एम. बी. वाघ, आकाश रूपवते, एफ. जे. सय्यद, रोहित लोणारे, निखिल वैद्य यांच्यासह वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोरीच्या सहाय्याने मृत बिबट्याला बाहेर काढून मोहदरी वनोद्यानात अग्निडाग देण्यात आला. गेल्या काही दिवसांत सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

घोटेवाडीत महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न

तालुक्यातील घोटेवाडी येथे डाळिंबबागेत काम करणार्‍या छाया नवनाथ घोटेकर, माया गोरक्षनाथ घोटेकर यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. महिलांनी प्रसंगावधान राखत हा हल्ला परतावून लावला. गेल्या महिनाभरापूर्वी याच डाळिंबाच्या बागेत एका मजूर महिलेवर बिबट्याकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. तेथे पिंजराही लावण्यात आला होता. मात्र, आठ – दहा दिवस पिंजरा ठेवूनही त्यात बिबट्या न अडकल्याने वनविभागाने हा पिंजरा इतरत्र हलवला. या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago