पुणे : प्रतिनिधी
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेप्रमाणेच बी 12 ची कमी पातळी सर्व वयोगटातील लोकांमध्ये, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येते. व्हिटॅमिन बी 12 कमतरतेमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात जळजळ, थकवा, आरोग्य समस्या, चालण्यात अडचणी, बधीरपणा किंवा हात, पायांना मुंग्या येणे. तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या पातळीचे वेळोवेळी निरीक्षण करणे गरजेचे आहे तसेच, मशरूम, चिकन, अंडी, बदाम आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश
करण्याचा प्रयत्न करा, असे जनरल फिजिशियन, डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले. प्रत्येकाच्या शरीरात व्हिटॅमिन डी, जस्त, लोह किंवा कॅल्शियमची पातळीप्रमाणेच बी 12 ची देखील योग्य पातळी राखणे आवश्यत आहे. आज, बहुसंख्य किशोरवयीन मुलांमध्ये इ12 ची कमतरता आहे ज्यामुळे ते गंभीर संकटात सापडू शकतात. लाल रक्तपेशी, ऊती, डीएनए आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची चिन्हे आणि लक्षणे म्हणजे हात, पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, चालण्यास असमर्थता, अशक्तपणा, जीभेवर सूज येणे, शरीरात जळजळ, आरोग्य समस्या थकवा, चिडचिड, भूक कमी होणे, शारीरीक हालचाली उलट्या, अतिसार हायपरपिग्मेंटेशन, शारीरिक विकास मंदावणे आणि थकवा. जेव्हा शरीर पुरेसे व्हिटॅमिन शोषून घेत नाही किंवा साठवत नाही किंवा एखाद्याला त्याची पुरेशी मात्रा मिळत नाही तेव्हा व्हिटॅमिन बी 12 कमतरता निर्माण होऊ शकते. ही कमतरता ही सर्वात दुर्लक्षित समस्यांपैकी एक आहे. चूकीचा आहार, फास्ट फूडचे सेवन यामुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता वाढत आहे, असे ते म्हणाले.