क्षयरोगाच्या संसर्गामुळे होतोे फुफ्फुसाच्या प्रणालीवर परिणाम

पुणे : प्रतिनिधी
क्षयरोग (टीबी) फुफ्फुसावर गंभीर परिणाम करतोच, परंतु गर्भाशयात आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये देखील क्षयरोग पसरू शकतो. ज्यामुळे गर्भधारणा गुंतागुंत किंवा वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो. गर्भधारणेदरम्यान होणारे क्षयरोगाचे निदान गर्भवती महिलांसाठी आणि बाळासाठीही धोकादायक असू शकते, जर

योग्य वेळी उपचार केले नाहीत तर धोका निर्माण होऊ शकतो. टीबीमुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.असे प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ,डॉ पद्मा श्रीवास्तव, यांनी सांगितले. क्षयरोग (टीबी) हा एक जीवघेणा संसर्गजन्य रोग आहे जो फुफ्फुसावर परिणाम करतो. हे मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होते. क्षयरोगाला आमंत्रण देणारे जिवाणू खोकताना आणि शिंकताना हवेमार्गे एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पसरतात. खोकला, छातीत दुखणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, थकवा, ताप, रात्री घाम येणे आणि थंडी वाजून येणे ही टीबीची लक्षणे आहेत. टीबीचे प्रकारातील ऍक्टीव्ह टीबी हा एक आजार आहे ज्यामध्ये टीबीचे जीवाणू झपाट्याने वाढतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर आक्रमण करतात. मिलिटरी क्षयरोग हा संपूर्ण फुफ्फुसाच्या ऊतींना प्रभावित करतो आणि गंभीर समस्या निर्माण करू शकतो आणि गर्भवती महिलांना टीबीचा त्रास होऊ शकतो. क्षयरोगाच्या गुंतागुंतीमध्ये गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाचे बाळ आणि नवजात बालकांमधील मृत्यूदर यांचा समावेश होतो. गरोदरपणात सक्रिय टीबीचा संसर्ग झाल्यास आई आणि बाळाला धोका होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *