नाशिक

सोनारी दुर्घटनेतील सासू, जावयाच्या मृत्यूनंतर मुलीचाही मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी
स्वत:ला ज्वलनशील पदार्थाने पेटवून घेत पत्नी आणि सासूला मिठी मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न तालुक्यातील सोनारी येथे जावयाने केला होता. या घटनेत पहिल्याच दिवशी जावयाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आठवडाभरात सासूचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर भाजल्याने नाशिक येथे उपचार सुरू असलेल्या पत्नीचाही दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. स्नेहल केदारनाथ हांडोरे (19, रा. शिंदेवाडी) असे मयत महिलेचे नाव आहे.
सोनारी येथील जळीत प्रकरणी तिघांचाही दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. केदारनाथ दशरथ हांडोरे (24) रा. शिंदेवाडी, ता. सिन्नर याने पत्नी स्नेहल (19) माहेरी राहण्यासाठी आल्यानंतर सोनारी येथे जाऊन वाद घातला. चाकूचा धाक दाखवून मित्रांच्या मदतीने पळवून नेण्याचा प्रयत्नही केला होता.
यात त्याने स्वत:ला पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेत केदारनाथ याने पत्नी स्नेहल व सासू अनिता सोमनाथ शिंदे (38) यांना मिठी मारली होती. घटनेनंतर केदारनाथचा मृत्यू झाला.
त्यानंतर सासू अनिता शिंदे यांचाही उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. पत्नी स्नेहल हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सोनारी येथे शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपनिरीक्षक संजय वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

Gavkari Admin

Recent Posts

सिडकोतील कामठवाडे भागात तरुणाचा खून

सिडको : दिलीपराज सोनार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात असलेल्या अमरधाम रोड नजीक एका…

6 hours ago

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना

पंचवटी : वार्ताहर म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर पार्क, बालकृष्णनगर, कंसारा माता चौक आणि शांतीनगर,…

6 hours ago

एकाच कुटुंबातील 5 जणांचा अपघातात मृत्यू

जयपूर : एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रेलर आणि कारची समोरासमोर…

6 hours ago

म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त दोन दिवसीय कुस्त्यांची दंगल

सिडको ः विशेष प्रतिनिधी उंटवाडी येथील नंदिनी नदीच्या तीरावर असलेल्या आणि गर्द हिरव्या महाकाय वटवृक्षाच्या…

6 hours ago

श्रीराम मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

सिन्नर : प्रतिनिधी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिन या कालावधीत…

6 hours ago

चारा पाण्याचे शोधार्थ मेढपाळांचा गोदाकाठला डेरा

शिवार गजबजले दुभत्या जनावरांनी निफाड ः आनंदा जाधव उन्हाची तीव्रता वाढत असतानाच नदी नाले कोरडेशुष्क…

7 hours ago