नाशिक

ठाकरेंकडून लढण्यासाठी 110 जणांंची तयारी

सिडको, सातपूर विभागांमधून मुलाखतींना प्रारंभ

नाशिक : प्रतिनिधी
विधानसभेत अपयश आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटासाठी नाशिक महापालिकेची निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. दरम्यान, विधानसभेतील पराभवाचे अपयश झटकून महापालिकेच्या निवडणुकीला पदाधिकारी, कार्यकर्ते लागले आहेत. शुक्रवारी (दि.19) सातपूर व सिडको विभागातील अकरा प्रभागांकरिता 110 जणांंनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी मुलाखत दिली.
शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संघटक रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थित या मुलाखती घेण्यात आल्या.
नाशिक महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इतर पक्षांप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाकडून कधी मुलाखतीचा मुहूर्त लावला जाणार याकडे नजरा लागल्या होत्या. अखेर शुक्रवारपासून मुलाखतीला सुरुवात करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह माजी नगरसेवकांनी दुसर्‍या पक्षाशी घरोबा केल्याने ठाकरे गटाला सिद्ध करण्यासाठी महापालिका निवडणूक असणार आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता मुलाखतींना सुरुवात झाली. सकाळी पहिल्या सत्रात नवीन नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक 24, 25, 27, 28, 29 व 31 मधील इच्छुक, तर दुपारच्या सत्रात सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 व 26 येथील इच्छुक उमेदवारांनी मुलाखती झाल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, पश्चिम विभागाचे संपर्कप्रमुख विजय काळदाते, मसुद जिलानी, भारती ताजनपुरे, स्वाती पाटील, राणी गवळी, महेश बडवे, विष्णू पवार, सुभाष गायधनी, सुनील गोडसे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आज, शनिवारी(दि. 20) नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी व नाशिकरोड विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील. त्यात प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 व 6, तर दुपारच्या सत्रात नाशिकरोड परिसरातील प्रभाग 17, 18, 19, 20, 21 व 22 मधील इच्छुकांच्या मुलाखती होतील.

सातपूर, सिडकोतून महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांचा प्रतिसाद मिळतो आहे. शुक्रवारी 110 जण उपस्थित होते. शनिवारी नाशिकरोड व पंचवटीतील मुलाखती होणार आहेत.
– डी. जी. सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

110 people ready to fight on behalf of Thackeray
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago