नाशिक

ताईंबरोबरच भाऊंवरही निवडणुकीची जबाबदारी

अवघ्या 24 तासांत भाजपाचा ‘यू-टर्न’; म्हणे, संघटनात्मक व्यवस्था!

नाशिक : प्रतिनिधी

महापालिका निवडणूकप्रमुख पदावरून नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना हटवत त्यांच्या जागेवर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नियुक्तिपत्रही आ. फरांदे यांना मिळाले आहे. यामुळे आ. ढिकले समर्थक नाराज झाले. सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यानंतर 24 तासांतच भाजपाने यू-टर्न घेत निवडणुकीसाठी संघटनात्मक व्यवस्थेचा भाग म्हणून राहुल ढिकलेंबरोबरच आ. देवयानी फरांदे यांच्यावरही जबाबदारी सोपविल्याचे जाहीर करण्यात आले. अवघ्या 24 तासांतच भाजपाने असा यू-टर्न घेतल्याने यातून भाजपात सारे काही आलबेल नाही, हे समोर आले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने शंभर प्लसचा नारा दिल्यानंतर निवडणूकप्रमुख पदावर नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांची नियुक्ती केली होती. भाजपाने चार दिवस मुलाखतींचा कार्यक्रम राबविला. 122 जागांसाठी 1,200 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मुलाखती झाल्यानंतर मात्र भाजपाने अचानकपणे निवडणूकप्रमुख पदावर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती केल्याचे प्रदेशाध्यक्षांचे पत्र पाठविले. त्यामुळे ढिकले समर्थक नाराज झाले.
मध्यंतरी राहुल ढिकले यांनी एका जाहीर कार्यक्रमात ढिकले यांनी पक्षातीलच अंतर्गत विरोधकांवर तोफ डागली. आजारी असतानाही माझ्या विरोधात ज्यांनी काम केले, माझी रॅली अडवली, त्यांना अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही. मी निवडणूकप्रमुख आहे. 122 ठिकाणी कुणाला उमेदवारी द्यायची, हे मी ठरवेन. सर्वत्र हस्तक्षेप करणार नाही, पण ज्यांनी मला त्रास दिला त्यांना अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही, या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली.
यातून आ. ढिकले यांना आलेला अहंकार पाहता पक्षातील अंतर्गत विरोधकांना एकप्रकारे आयते कोलितच मिळाले. त्यामुळे त्यांच्या जागेवर आ. फरांदे यांची नियुक्ती केल्याचे सर्वत्र व्हायरल झाले. पण काल पुन्हा भाजपाच्या शहराध्यक्षांनी खुलासा करताना यासंदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचे खंडन केले. निवडणूक व्यवस्थेचा भाग म्हणून दोघांवरही जबाबदारी दिसल्याचा दावा केला. भाजपा हा शिस्त पाळणारा पक्ष समजला जातो. त्यामुळे 24 तासांतच भाजपाला अचानक यू-टर्न घेण्याची वेळ का आली?
जर दोघांवरही जबाबदारी दिलेली होती, तर आमदार फरांदे यांच्या नियुक्तिपत्रात तसा उल्लेख का नाही, असे एक ना अनेक प्रश्न यातून पुढे आले आहेत.

नाशिक महानगरपालिका निवडणूक व्यवस्थेचा भाग म्हणून अजून एक संघटनात्मक पद तयार करण्यात आले आहे. आता आ. अ‍ॅड. राहुल ढिकले व आ. प्रा. देवयानी फरांदे या दोघांवर नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनलवर आलेल्या उलटसुलट बातम्यांमध्ये तथ्य नाही.
– सुनील केदार, अध्यक्ष,
भाजप नाशिक महानगर जिल्हा

नाराज झाल्याने निर्णय फिरवला?

आ. राहुल ढिकले यांच्याऐवजी आ. देवयानी फरांदे यांची निवडणूकप्रमुख म्हणून केलेल्या नियुक्तीमुळे भाजपातील एक गट नाराज झाला असावा. त्यातून महापालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसू नये, ढिकले यांचे कार्यकर्ते नाराज होऊ नयेत म्हणून भाजपाने हा तोडगा काढला असल्याची चर्चा आहे.

ढिकले समर्थकांचा जीव भांड्यात

आमदार राहुल ढिकले यांच्यामुळे अनेक जण भाजपात आले. त्यांनी निवडणुकीत उमेदवारी देण्याचे अनेकांना आश्वासनही दिले होते. पण ऐनवेळी आ. फरांदेंना निवडणूकप्रमुख केल्यामुळे आता आपल्या उमेदवारीचे काय होणार? याची चिंता ढिकले समर्थकांना सतावत असतानाच पक्षाने ढिकलेंनाही निवडणूकप्रमुख म्हणून कायम ठेवल्याने समर्थकांचा जीव भांड्यात पडला आहे.

 

 

Along with the aunts, the responsibility of the election lies with the brothers as well.
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago