अनधिकृत होर्डिर्ंग्जविरोधातील मोहिमेला सुरवात
नाशिक : प्रतिनिधी
शहरात सर्रास विनापरवानगी होडिर्ंग्ज लावून परिसर विद्रूप करणार्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवार(दि. 16) पासून मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी 123 होर्डिंग्ज जप्त केले आहेत. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण विभागानेे म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात दिवाळीनिमित्तासह वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा देणार्या बॅनरची जत्रा भरल्याचे चित्र होते. होर्डिंग्ज, बॅनर व फ्लेक्स असे एकूण 123 प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दिवाळी संपताच महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्यांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी, मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर होर्डिंग्ज लावले जात असल्याने याचा वाहनधारकांना फटका बसतो आहे. अनेक ठिकाणी अपघात होण्याची भीती असते. प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती. अखेर अतिक्रमण विभागाने सोमवारी नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर-सिडको या सहा विभागांत पथकाद्वारे होडिर्ंग्ज हटवले.
विभागानुसार केलेली कारवाई
विभाग होडिर्ंग्ज बॅनर फ्लेक्स
नाशिकरोड 08 03 07
नाशिक पूर्व 13 12 03
नाशिक पश्चिम 10 02 06
नवीन नाशिक 09 03 04
सातपूर 14 02 04
पंचवटी 12 03 08
एकूण 123
अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील मोहिमेला सुरवात केली असून, यापुढेही ती चालूच राहील. शहरात कोणीही परवानगी न घेता होर्डिंग्ज लावण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा त्यांच्याविरोधात कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल.
– सुवर्णा दखणे, उपायुक्त अतिक्रमण, मनपा
123 hoardings seized in the city on the very first day