पोलीस खात्यात सर्वाधीक लाचखोर, महसूल दुसऱ्या स्थानी
नाशिक: प्रतिनिधी
सातव्या वेतन आयोगामुळे घसघशीत झालेला पगार, सरकारी नोकरीमुळे मिळणार्या इतर सुविधा अशी सारी परिस्थिती असूनही सरकारी काम करणार्यांची लाचखोरी थांबलेली नाही, सरत्या वर्षात लाचलुचपत प्रतिबांधाक वभागाने केलेल्या कारवाईत 125 अधिकारी, कर्मचारी लाच घेताना जाळ्यात अडकले, यात पोलीस विभागातील कर्मचारी सर्वांत जास्त तर त्याखालोखाल महसुलच्या कर्मचार्याचा लाच घेण्यात वरचा क्रमांक लागतो,
नाशिक,नगर,धुळे,नंदुरबार,जळगाव विभागातील वर्ग दोन,तीन क्लर्क,शिपाई, लोकसेवक,इतर लोकसेवक,सरकारी लोकसेवकांचे खासगी व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे.
पोलिस,महसूल,जिल्हा परिषद, भूमी अभिलेख,पंचायत समिती,कृषी विभाग,वनविभाग,महानगरपालिका,पाटबंधारे,आरोग्य विभाग,सहकार,परिवहन (आरटीओ),आदिवासी विकास विभाग,शिक्षण विभाग अशा एकूण पंचेचाळीस विभागात लाचखोर आढळून आले.
खड्डा चिकनची शहरात वाढती क्रेझ
नागरिकांच्या अडलेल्या शासकीय कामांसाठी चिरीमिरी किंवा मोठी रक्कम देऊन कामे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच मागीतली जाते. बर्याचदा लाच देऊनही काम न झाल्याने वैतागलेला तक्रारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जातो. त्यानंतर सापळे रचले जातात. योग्य पुरावे आणि साक्षीदारांच्या समक्ष हा सापळा लावून लाच घेणार्याला रंगेहाथ पकडले जाते.त्यानंतर पुढील कारवाई केली जाते.
नाशकात कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र
असे लाचखोर
विभाग। कारवाई
पोलीस 30
महसूल। 21
जिलपरिषद। 15
महावितरण। 10
शिक्षण। 4
आदिवासी। 4
खासगी व्यक्ती। 9
| ReplyForward |
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…