नाशिक

चांदवड टोलनाक्यावर 139 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

मालेगावातील तिघांना अटक; 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

चांदवड : वार्ताहर
मुंबईहून मालेगावच्या दिशेने होत असलेला अमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा प्रयत्न चांदवड पोलिसांनी उधळून लावला. मुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ टोलनाक्यावर केलेल्या नाकाबंदीत 139.99 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जसह 16 लाख 18 हजार 278 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मालेगाव येथील तीन आरोपींना अटक केली असून, चांदवड न्यायालयाने त्यांना 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबईकडून मालेगावच्या दिशेने चारचाकी वाहनातून एमडी ड्रग्जची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार 1 ऑगस्टला दुपारी 3.20 च्या सुमारास मंगरूळ टोलनाक्यावर लेन क्र. 5 वर नाकाबंदी करण्यात आली. संशयास्पद वाटणार्‍या किया करेन्स कारची (एमएच 41 बीएल 2720) झडती घेतली असता, कारमधील तिघांकडून 3.07 लाख किमतीचे 139.99 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. पोलीस हवालदार स्वप्नील निंबा जाधव यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (2 ऑगस्ट) आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चांदवड पोलीस तपास करीत आहेत.

अटक केलेले संशयित, जप्त मुद्देमाल

अटक करण्यात आलेल्या आरोपींत शेख शहबाज शेख निसार (वय 21, रा. अब्बासनगर, मालेगाव), अब्दुल रहमान शेख अकबर (वय 23, रा. रिंकाबाद, मालेगाव), शेख रेयान शेख सफीउद्दीन (वय 32, रा. सलामताबाद, मालेगाव). जप्त केलेला मुद्देमाल- एमडी ड्रग्ज (139.99 ग्रॅम) 3,07,978 रुपये, किया करेन्स कार- रु. 12,00,000 रुपये, 4 प्रीमियम मोबाइल 95,000 रुपये. रोख रक्कम- 15,300 रुपये, एकूण ऐवज- 16,18,278 रुपये.

139 grams of MD drugs seized at Chandwad toll plaza.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…

- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…

15 hours ago

मोबाईलमुळे भविष्य संकटात

- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…

15 hours ago

नाठाळांच्या माथी हाणा काठी!

- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…

15 hours ago

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…

15 hours ago

खड्ड्यांचे पाप कोणाचे?

- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…

15 hours ago

ऊर्जेची बचत, यशाची गुरुकिल्ली!

- जगन घाणेकर  वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…

15 hours ago